मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – ग्रामीण भागातील जनतेला हर घर नल से जल द्वारे 55लिटर शुध्द व सुरक्षित पाणीपुरवठा करणे हे जलजीवन मिशन चे मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी सेनगाव पंचायत समिती येथे आयोजित तालुकास्तरीय एकदिवसीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
जलजीवन मिशन अंर्तगत पाणीगुणवत्ते विषयक व्यापक प्रसिद्धी करिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयजी दैने मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्मारामजी बोंद्रे सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पंचायत समिती सभागृह येथे नुकतीच तालुकास्तरीय एक दिवसीय पाणीगुणवत्ता विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी साखरा प्रा.आ. केंद्राचे वैदकिय अधिकारी निलेश कुमावत, पं.स.चे कार्यालयीन अधिक्षक हातमोडे, गुंजन काळे व आर.पी.जारे. विस्तार अधिकारी (पंचायत), अनिल पुंडगे वि.अ. आरोग्य, ग्रामसेवक/ ग्रा.वि.अ.आरोग्य सेवक, ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता, गटसमन्वयक व समुह समन्वयक संजय वैद्य, सुरेश आघम व पानपट्टे हे उपस्थित होते.
सर्व प्रथम हातमोडे कार्यालयीन अधिक्षक, गुंजन काळे व आर.पी.जारे विस्तार अधिकारी (पं), अनिल पुंडगे विस्तार अधिकारी (आरोग्य), महेश थोरकर जल निरिक्षक यांचे हस्ते संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलनाने प्रशिक्षणास सुरूवात झाली.
या प्रसंगी गुंजन काळे यांनी मानवीय जीवनात पिण्याचे पाण्याचे महत्व व जलजीवन मिशन अंर्तगत हस्तांतरित नळ योजनांची देखभाल व दुरूस्तीत गावातील ग्रा.प. ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती तसेच गावातील समुदायाचे योगदान याबाबत माहिती दिली.
जल निरिक्षक महेश थोरकर यांनी जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सुचना, जलसुरक्षक शासन निर्णय व जलसुरक्षकाचे कर्तव्य, क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे पाणीनमुनेची तपासणीबाबतचा शासन निर्णय व गावातील 5 प्रशिक्षित महिला व जलसुरक्षक यांचे मार्फत FTK संचाद्बारे करावयाची पाणीनमुने तपासणी व त्याचे निष्कर्षाच्या नोंदी केंद्र शासनाच्या WQMIS पोर्टलवर घेणे तसेचपाणी गुणवता संनियत्रंण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी करिता दि.20 जुलै 2022 च्या शासन निर्णया अन्वये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मधील विविध यंत्रणेची जबाबदारी व कर्तव्य तसेच भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे कार्य याबाबत माहिती दिली.
द्वितीय सत्रात उप विभागीय भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेतील रसायनी व अणुजीव तज्ञ राहुल भालेराव व बेले यांनी प्रशिक्षणार्थी यांना FTK संचाद्वारे सार्वजनिक पिण्याचे पाण्याचे स्रोत, शाळा, अंगणवाडी व घरगुती नळजोडणी यांचे पाणीनमुने तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले व त्याचे आलेल्या निष्कर्षाची wqmis पोर्टलवरच्या नोंदी घेणेबाबत मार्गदर्शन केले.
सेनगाव तालुक्यातील PWS स्रोत, शाळा, अंगणवाडी व प्रत्येक गावातील दोन घरगुती नळजोडणी यांचे 100% पाणी नमुने भुजल सर्वेक्षण च्या प्रयोगशाळेत सादर करणेबाबत आव्हान करण्यात आले.
तसेच दुषीत आलेल्या पाणी नमुनेवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे बाबत चर्चा करण्यात आली. पाणी नमुने गोळा करण्याची योग्य पध्दत, ब्लिचिंग पावडर द्वारे जलस्रोत शुध्दीकरणाची पध्दत, O.T. टेस्ट बाबत अनिल पुंडगे यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश आघम व प्रास्ताविक महेश थोरकर यांनी केले. प्रशिक्षणाच्या शेवटी आर.पी.जारे यांनी आभार व्यक्त केले.