Marmik
Hingoli live

जयाजी पाईकराव यांना ‘पर्यावरण योद्धा पुरस्कार’ जाहीर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – जयाजी पाईकराव (अध्यक्ष, उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांना पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र विकास, जैवविविधता संरक्षण आणि वातावरणीय बदल आधारित शेती या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित ‘पर्यावरण योद्धा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.


हा सन्मान पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (केंद्र) यांच्या वतीने देण्यात येत असून, पुरस्कार वितरण सोहळा दि. ०१ मार्च २०२५ रोजी, आदिवासी सांस्कृतिक भवन, तळोदा, जि. नंदुरबार येथे पार पडणार आहे.


जयाजी पाईकराव यांनी गेल्या ४० वर्षांपासून पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकास, वृक्ष लागवड, गवताळ पट्ट्याचे संवर्धन, सेंद्रिय शेती अशा प्रकल्पांच्या माध्यमातून जैवविविधतेचे संवर्धन, जमिनीचे सुपीकत्व वाढवणे, जलसंधारणाचे प्रभावी उपाय राबवणे, शाश्वत शेती प्रणाली विकसित करणे आणि हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती रुजवणे यासाठी मोठे कार्य केले आहे.

अनेक गावांनी पाणलोट क्षेत्र विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि शेतीतून शाश्वत उत्पन्न वाढवणे यामध्ये यश मिळवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत, त्यांना महाराष्ट्र राज्यातील ‘पर्यावरण योद्धा’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.

Related posts

असहाय वयोवृद्ध व्यक्तीच्या मदतीला धावले हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यतत्पर पोलीस अधीक्षक; उपचार करून वयोवृद्ध व्यक्तीस त्याच्या गावी पाठविले

Santosh Awchar

सतत गुन्हे करणारी टोळी पोलीस अधीक्षकांच्या हिटलिस्टवर ! पुसेगाव येथील दोघे दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar

बुधवारपासून तीन दिवस रामलीला मैदानावर ‘जाणता राजा’चे आयोजन

Gajanan Jogdand

Leave a Comment