Marmik
Hingoli live

जिंतूर – फाळेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या नाल्यांना गेले तडे; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-

सेनगाव – जिंतूर – फाळेगाव राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या महामार्गाच्या कडेला नालीचे बांधकाम केले जात असून बांधकाम करण्यात आलेल्या नालीला पाण्याचा थेंबही टाकला जात नाहीये. त्यामुळे नालीच्या बांधकामाला जागोजागी तडे गेले असून या बांधकामाला पाणी न दिल्याने शासनाचा करोडो रुपयांचा निधी पाण्यावाचून ‘नालीत’ जाण्याची शक्यता आहे. सदरील बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून जिंतूर – फाळेगाव राष्ट्रीय महामार्ग बनविला जात आहे. या महामार्गाचे काम काही ठिकाणी पूर्णत्वास गेले असून काही काम शिल्लक आहे.

महामार्गाच्या कडेला म्हणाली चे बांधकाम केले जात आहेत. हा महामार्ग सेनगाव येथून जात असून येथे या महामार्गाचे काम पूर्णत्वास गेल्याचे दिसते. त्यामुळे महामार्गाच्या कडेला नालीचे बांधकाम केले जात आहे; मात्र करण्यात येणाऱ्या नालीच्या बांधकामावर पाण्याचा थेंबही टाकला जात नसल्याने नालीच्या बांधकामाला जागोजागी कडे गेले आहेत.

त्यामुळे सदरील नाल्या अल्पशा काळातच जमीन उद्ध्वस्त होण्याची शक्यता असून या नाल्यांच्या बांधकामावर पाणी न टाकल्याने शासनाचा करोडो रुपयांचा निधी वाया जात आहे.

संबंधित बांधकामाकडे हिंगोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून एवढ्या मोठ्या राष्ट्रीय महामार्गाच्या नालीचे बांधकाम बोगसपणे केले जात असल्याचे दिसते.

याकडे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागास जाब विचारण्याची गरज आहे.

Related posts

राष्ट्रीय युवा दिन निमित्त आदर्श महाविद्यालयात रोल प्ले स्पर्धा

Gajanan Jogdand

हिंगोली पोलीस कवायत मैदानावरील किल्ला, पोलीस कॅन्टीन व नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन

Santosh Awchar

कधीही या कार्यालय बंदच; हिंगोली तलाठी कार्यालयाचा भोंगळ कारभार

Santosh Awchar

Leave a Comment