मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – कळमनुरी तहसीलदार यांच्या विरोधात हिंगोली भाजपा महिला आघाडीच्या सरचिटणीस पुष्पा शिंदे यांच्या नेतृत्वात निराधार, अपंग, श्रावण बाळ, परितक्त्या महिला, तसेच दारिद्र्यरेषेखालील महिला व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सदरील प्रकरणी कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
कळमनुरी तहसीलदार या खुर्चीवर अरुण झाल्या तेव्हापासून निराधार अपंग श्रावण बाळ परितक्त्या महिला व गोरगरीब दारिद्र्यरेषेखालील महिला व ग्रामस्थांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही.
तसेच मंडळाधिकारी हे गरजू लाभार्थ्यांकडून एका स्वाक्षरीसाठी हजार रुपये घेत आहेत, आता तपासणी मध्ये पैसे मिळत नसल्याने ते सही करत नाहीत. त्यामुळे गरीब लोकांना शासनाकडून मिळणाऱ्या पगारी दिल्या जात नाही तसेच कमी किंवा जास्त दिल्या जातात इतर योजनांमध्येही संबंधित अधिकारी हे पैसे घेतात, गोरगरिबांच्या योजनेवर या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही यांच्यावर नियंत्रण मिळवून कठोर कार्यवाही करावी, तसेच निलंबित करण्यात यावी अशी मागणी या महिलांनी केली होती.
सदरील प्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल लेखी असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उपोषण करताना दिल्यानंतर सदरील बेमुदत अमरण उपोषण मागे घेण्यात आले.