मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथील एका इसमाने आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर हिंदू व मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने स्टेटस ठेवले होते. या इसमास कळमनुरी पोलिसांनी कंजारा येथे पोहोचून तात्काळ अटक केली आहे.
हिंगोली पोलिसांनी वारंवार सूचना देऊन व जनजागृती करून देखील 20 जून रोजी 11 वाजेच्या सुमारास औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथील प्रभाकर गंगाराम कल्याणकर याने त्याचा मोबाईल क्र. 9850978932 वर अक्कलकोट येथील एका घटनेचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलवर प्राप्त झाल्याने त्यावर त्याने आक्षेपार्य पोस्ट व्हाट्सअप वर टाकून हिंदू व मुस्लिम समाजात दोन जाती – जातीमध्ये दंगल होण्याच्या उद्देशाने आक्षेपार्य स्टेटस दुसऱ्याच्या मोबाईल व्हाट्सअप वर टाकली.
त्यामुळे कळमनुरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ कंजारा येथे पोहोचून प्रभाकर गंगाराम कल्याणकर यास ताब्यात घेतले.
तसेच कळमनुरी पोलीस ठाणे येथे त्यास घेऊन येऊन त्याच्याविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाणे येथे भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंभोरे, पोलीस हवालदार सांगळे, शेळके, पोलीस नाईक, पोलीस शिपाई देवगुंडे यांनी केली.