मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील लासीना शिवारात चालणाऱ्या 52 ताश पत्त्यावरील झन्नामन्ना जुगारावर कळमनुरी पोलिसांनी धडक कार्यवाही करत 10 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 लाख 86 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यात लपून छपून चालणारे अवैध धंद्याबाबत कठोर भूमिका घेत त्यावर कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथक तसेच सर्व पोलीस ठाण्याला सूचना दिल्या आहेत. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही बाबत विशेष मोहीमही राबविली जात आहे.
5 मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान कळमनुरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कळमनुरी पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार यांनी हद्दीतील लासीना शिवारात पांदण रस्त्याजवळ 52 तास पत्त्यावर पैशाची बाजी लावून झन्नामन्ना जुगाराच्या खेळ चालू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणारे प्रकाश गंगाधर घुगे, चंद्रभान कैलास घुगे दोन्ही (रा. सेलसुरा), अनिल मारोतराव ढाले (रा. बोरीशिकारी), आकाश राघोजी हनवते (रा. हातमाली), तानाजी पुरभाजी जाधव (रा. लासीना) रामेश्वर विठ्ठल खेडेकर दोन्ही (रा. लासिना), संतोष माणिकराव सोनुने (रा. कळमनुरी) हे मिळून आले.
घटनास्थळावरून पोलिसांनी नगदी तेवीस हजार 440 रुपये, एकूण पाच मोटार सायकल व सहा मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असे एकूण 3 लाख 86 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
छापा टाकतेवेळी घटनास्थळावरून पोलिसांना पाहून जुगार खेळणारे फकीरा बाबाराव दराडे, सतीश कैलास घुगे दोन्ही (रा. सेलसुरा), अशोक काशीराम मुंडे (रा. हिवराबेल), हे घटनास्थळावरून पळून गेले आहेत.
या सर्वांविरुद्ध पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोनुळे, पोलिसांमलदार किशोर खिल्लारे, दादासाहेब कांबळे, शिवाजी देवगुंडे, शकुराव बेले, होमगार्ड शेख मुजीब व बांगर यांनी केली.