Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

महावीर इंटरनॅशनल संस्थेने घेतले कर्मवीर नामदेवराव पवार शाळेला दत्त्तक

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – येथील महावीर इंटरनॅशनल छत्रपती संभाजीनगर या संस्थेतर्फे कर्मवीर नामदेवराव पवार शाळेला एक वर्षासाठी दत्तक घेण्यात आले. शाळेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महावीर इंटरनॅशनल छत्रपती संभाजीनगर या संस्थेतर्फे नेहमी सामाजिक व जनकल्याणकारी योजना राबविल्या जातात. याच अंतर्गत कर्मवीर नामदेवराव पवार शाळेला पुर्ण एक वर्षासाठी दत्त्तक घेतले. यामध्ये लहान छोटी छोटी मुले शिक्षण घेतात.

काही मुला – मुलींना आपले पालक नाहीत. काहीचे आई वडील मोल मजुरी करतात. हे लक्षात घेवुन महावीर इंटरनॅशनलने मुलांकरिता ड्रेस, कपडे, वहया, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, जे काही लागतात ते देण्याचे ठरविले आहे.

यावेळी महावीर इंटरनॅशनल अ‍ॅपेक्स चे आंतरराष्ट्रीय महासचिव जयपुर हुन छत्रपती संभाजीनगरला भेट दिली व याचे औचित्य साधुन हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी विरा महिलांनी त्या शाळेला एक वर्षाकरिता दत्त्तक घेण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी अध्यक्ष पारस तातेड, अशोक गोयल, सचिव अरुण खारीवाल, अमृत खाबीया, पारस छाजेड, प्रकल्प प्रमुख विरा हेमलता मुगदिया, विरा अल्का तातेड, विर नंदलाल बोथरा, विरा बोथरा आदींची उपस्थिती होती.

हा कार्यकम कर्मवारी नामदेवराव पवार प्राथमिक विदयाला काबरा नगर येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेचे अध्यापक शेवाळे सर यांनी या उपकमा बददल महावीर इंटरनॅशनलचे आभार मानले.

Related posts

सेलिब्रेटिंग द एक्सायटमेंट सोहळा; जिल्हा व्यापारी महासंघ आणि मराठवाडा चेंबर यांनी घेतला पुढाकार

Gajanan Jogdand

जितो लेडीज विंग तर्फे उडाण प्रदर्शनाचे आयोजन

Gajanan Jogdand

क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनिश्री तरुणसागर महाराज यांचा ६ वा समाधी दिवस विविध सामाजिक व धार्मिक उपकमाने संपन्न

Gajanan Jogdand

Leave a Comment