मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 8 तारखेस निघणाऱ्या कावड यात्रेची पूर्वतयारी बैठक आज 3 ऑगस्ट रोजी औंढा नागनाथ येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.
यावेळी आमदार संतोष (दादा) बांगर यांनी कावड यात्रेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असल्याने सर्व शिवप्रेमीनी जास्तीत जास्त संख्येने कावड यात्रेस येण्याचे आवाहन केले व आपली कावड यात्रा ही जल्लोषात व शिस्तीत निघाली पाहिजे. यासाठी सर्वच शिवभक्तांनी काळजी पूर्वक व सतर्क राहिले पाहिजे अशी सूचना उपस्थित शिवसैनिकांना केली.
यावेळी औंढा नागनाथ शहर व तालुक्यातुन जास्तीत जास्त संख्येने कावड यात्रेसाठी उपस्थित राहणार असल्याचे उपस्थित शिवसैनिकांनी आमदार संतोष (दादा) बांगर यांना सांगितले.
यावेळी जि. प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, अनिल भाई देशमुख,रामजी नागरे, श्रीराम दादा राठी, राहुल दंतवार, प्रा.विष्णू पवार,अनिल देव,प्रदीप कणकुटे, मनोज देशमुख, दिलीप राठोड,गंगाधर राव पोले,राजू पाटील कर्हाळे, शंकर यादव,लखन शिंदे,बाबुराव सावळे,माधव गोरे,लल्ला देव,प्रदीप गिरी,बाळू तेली व मोठ्या संख्येने औंढा शहर व तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.