मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – तालुक्यातील दिग्रस कराळे येथील एका युवकाचे आरोपींच्या मैत्रीणीशी का बोलतोस या कारणावरून अपहरण करण्यात आले होते. सदरील व्यक्तीच्या सुटकेसाठी आरोपींनी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच न दिल्यास त्यास जीवे मारू अशी दिली होती. सदरील प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व हिंगोली ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासात निकाली लावून अपहरत व्यक्तीची सुखरूप सुटका केली. तसेच अपहरण करून खंडणी मागणाऱ्या तिन्ही आरोपींच्या मुस्क्या आवळल्या सदरील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दि. ११/०३/२०२४ रोजी पहाटे ४ वाजनेचे सुमारास पो.स्टे. पो.स्टे. हिंगोली ग्रामीन येथे फिर्यादी नामे प्रमोद शेषराव पांडे (वय २५ रा. डिग्रस कऱ्हाळे) यांनी माहिती दिली की, त्याच भाउ नामे विनोद शेषराव पांडे (वय ३५ वर्ष व्य. चालक) याचे कुणीतरी अज्ञात लोकांनी अपहरन केले असुन त्याला सुखरुप सोडन्यासाठी दहा लाखाची खंडनी मागत आहेत अन्यथा भावाला खतम करतो असे मोबाईलद्वारे सांगत आहेत, अशा प्रकारची माहिती प्राप्त झाली.
या वरुन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन सदर खंडनीखोर आरोपीस पकडुन त्यांच्या ताब्यातील इसमाची सुखरुप सुटका करन्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील व हिंगोली ग्रामीणचे ठानेदार विजय रामोड यांना दिल्या.
पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुचना दिल्या वरुन आरोपीस पकडनेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामोड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विठुबोने यांचे पथक फिर्यादीस घेवुन व डमी १० लाखाची बॅग घेवुन दाटेगाव लोहगाव परीसरात गेले असता खंडणीखोरांनी वेळोवेळी लोकेशन बदलत राहीले. पालीस पथक दाटेगाव व लोहगाव शेत – शिवार धुंडाळला, परंतु आरोपी सापडत नव्हते.
शेवटी आरोपीनी केशव माळ या टेकडीवर दहा लाख रुपयाची बॅग ठेवन्याचे सांगीतले त्यावरुन पालीस पथकाने शेतकऱ्याच्या वेशात फिर्यादीचा भावु सोबत नेवुन डमी पैशाची बॅग केशव माळ परीसरात ठेवून बाजुला झाडा झुडपात बसले असता आरोपीने थोड्यावेळाने सदर पैशाची बॅग नेण्यासाठी जवळ येताच दबा धरून बसलेल्या पोलीसांनी आरोपीचा पाठलाग करून एका आरोपीस पकडले असता त्याने त्याचे नाव गाव ओमकार उर्फ शुटर केशव मुखमाहाले (वय २० वर्ष व्य. मजूरी रा. डिग्रस क-हाळे) असे सांगीतले.
त्याचे सोबत असलेले इतर साथीदार आरोपी हनुमान उर्फ हंन्टर विश्वनाथ क-हाळे (वय २५ वर्ष), नितीन उर्फ जादु रामेश्वर क-हाळे (वय १९ वर्ष, सर्व रा. डिग्रस क-हाळे) यांनी मिळून हनुमान उर्फ हंन्टर याचे मैत्रीनीला विनोद शेषराव पांडे हा बोलत असल्याचे कारणावरून डिग्रस क-हाळे गावातून विनोद पांडे यास केशवमाळावर घेवून जावून जिवंत सोडण्यासाठी १० लाख रूपयाची खंडणी मागीतल्याचे सांगुन इतर दोन साथीदार आरोपी व ताब्यातील विनोद पांडे हा केशवमाळावर असल्याचे सांगितले.
यावरून पोलीस पथकांने केशव माळावर जावून इतर दोन आरोपीला ५ कि. मी. पाठलाग करून आरोपीचे ताब्यातील घातक हत्यारासह (खंजीर) पकडले व इसम विनोद पांडे याची सुखरूप सुटका केली. सदर ताब्यातील आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असून रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड , स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलीस अंमलदार किशोर सावंत, महादु शिंदे, विशाल खंडागळे, गजानन पोकळे, विठठल काळे, राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, दिपक पाटील व पोस्टे हिंगोली ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, असलम गारवे, होमगार्ड विशाल मोहीते, कोरडे यांनी केली.
अवघ्या चार तासात ४ ते ५ कि.मी. पाठलाग करून तिनही आरोपीस ताब्यात घेवून ताब्यातील इसमास सुखरूप सुटका केल्यामुळे पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले.