Marmik
Hingoli live Love हिंगोली

कोतवाल भरती : 27 ऑगस्ट रोजी हिंगोलीतील 12 परीक्षा केंद्रावर पार पडणार परीक्षा

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – उपविभागातील हिंगोली व सेनगाव तहसील कार्यालयांतर्गत कोतवाल भरती परीक्षा-2023 ही हिंगोली जिल्हा मुख्यालयी दि.27 ऑगस्ट,2023 रोजी सकाळी 11 ते दु. 12.30 या वेळेत घेण्यात येणार आहे.          

ही परीक्षा हिंगोली जिल्ह्यातील आदर्श महाविद्यालय अकोला रोड हिंगोली भाग-अ, आदर्श महाविद्यालय अकोला रोड हिंगोली भाग-ब, पोदार इंटर नॅशनल  स्कूल अकोला रोड, हिंगोली, सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल शास्त्रीनगर हिंगोली, शासकीय तंत्रनिकेतन लिंबाळा एमआयडीसी, हिंगोली,  जिल्हा परिषद कन्या प्रशाला शिवाजीनगर हिंगोली, सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय हिंगोली, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला शिवाजीनगर हिंगोली, श्री संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे महाविद्यालय अकोला रोड हिंगोली, कै.बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अकोला रोड हिंगोली, अनुसया मंदिर खकाळी बायपास हिंगोली, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र अकोला रोड हिंगोली या 12 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.

या 12 केंद्रावर 2 हजार 621 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. हिंगोली उपविभागातील वरील परीक्षा केंद्र परिसरात दि. 27 ऑगस्ट, 2023 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

तसेच परीक्षा केंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही.

परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Related posts

विशेष मोहीम : न्यायालयाकडून प्राप्त 46 अजामीन पात्र वॉरंटची बजावणी, वॉरंट मधील इसमांना पकडून न्यायालयात केले हजर

Santosh Awchar

प्रभावी अंमलबजावणीसाठी बेलथर येथे ग्राम बाल सरंक्षण समितीची बैठक

Santosh Awchar

स्थानिक झेंडूचे दर पडले! बेंगलोर, कोल्हारकडील झेंडू बाजारात दाखल

Gajanan Jogdand

Leave a Comment