मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत तालुक्यातील बारडी बागल शिवारात चालणाऱ्या 52 ताश पत्ता जुगार अड्ड्यावर कुरुंदा पोलिसांनी कारवाई करत 6 लाख 58 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी एकूण सोळा आरोपीं विरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 11 जणांनी घटनास्थळावरून धूम ठोकली आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यात लपून छपून चालणारे अवैध धंद्याबाबत कठोर भूमिका घेत त्यावर कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथक तसेच सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात अवैध धंदा विरुद्ध कार्यवाही बाबत विशेष मोहीम सुद्धा राबविली जात आहे.
5 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कुरुंदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे व त्यांचे अधिनस्त पोलिस अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील पारडी बागल शिवारात गजानन दशरथ पतंगे यांच्या शेतात अवैधरित्या 52 तास पत्त्यावर पैशाची बाजी लावून अंदर बाहेर जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली.
यावेळी जुगार खेळणारे सुरेश नामदेवराव हनुमते (रा. सोलापूर तालुका कळमनुरी), उद्धव विश्वनाथ नरवाडे (रा. पारडी बागल), किशन यादवराव काळीपेटे (रा. पारडी बागल), बालाजी दिगंबर बागल (रा. पारडी बागल), नागनाथ संगप्पा गवकोंडे (रा. काळीपेठ वसमत) हे मिळून आले.
घटनास्थळावरून पोलिसांनी नगदी 26 हजार 380 रुपये व एकूण 9 मोटरसायकल व मोबाईल असा एकूण 6 लाख 58 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी मारलेल्या छापे वेळी घटनास्थळावरून पोलिसांना पाहून जुगार खेळणारे पळून गेलेले इसम नामे गजानन उमाजीराव पाडव (रा. सालापूर तालुका कळमनुरी), प्रमोद बंडू बागल (रा. पारडी बागल), एजाव कुरेशी (रा. कुरुंदा), पांडुरंग यादवराव बैल (रा. सोलापूर तालुका कळमनुरी), शहाजी उर्फ शहादत उत्तमराव बागल (रा. पारडी बागल), बंडू संभाजी बागल (रा. पारडी बागल), गजानन दशरथ पतंगे (रा. पारडी बागल), रमेश जगदेवराव बागल (रा. पारडी बागल), बाळू भगवानराव सवडकर (रा. रेडगाव), गंगाधर रावसाहेब (रा. पार्डी बागल) मोटार सायकल क्रमांक एम एच 20, एजे 2506 चालक असे घटनास्थळावर मिळून आलेले एकूण एकूण पाच व घटनास्थळावरून पळून गेलेले 11 अशा एकूण 16 आरोपी विरुद्ध कुरुंदा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वसमत चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, पोलीस अंमलदार धतुरे, आंबेकर, आमले, इमरान सिद्धीकी, राठोड, पांढरे, कोटकर सर्व पोलीस ठाणे कुरुंदा यांनी केले.