मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 सप्टेंबर रोजी एका शेतकऱ्याने आणलेल्या मुगाला लक्ष्मीच पावल्याचे चित्र आहे. या शेतकऱ्याच्या मुलाला 6 हजार 320 रुपयांचा दर मिळाला.
3 सप्टेंबर शनिवार रोजी हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील एका शेतकऱ्याने दोन क्विंटल मूग विक्रीसाठी आणला होता.
या शेतकऱ्याने सकाळी आणलेला मूग अवघ्या काही मिनिटातच शेतकऱ्यांनी खरेदी करून नेला. सदरील शेतकऱ्याकडून खरेदीदार शेतकऱ्यांनी एक किलो, दोन किलो, तीन किलो याप्रमाणे मूग खरेदी केल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले ज्येष्ठा गौरी पुढे विविध धान्यांच्या राशी करून ठेवण्यात येतात.
यासाठीच शेतकऱ्यांनी सदरील मूग खरेदी केल्याचे समजते. यावरून मुग विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यास लक्ष्मी पावल्याचे चर्चा होत आहे.