मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – केंद्र शासनाच्या जनशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलजीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना स्वच्छ व दर्जेदार पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जल जीवन सर्वेक्षण 2023 चा भाग असणारे आहे. स्वच्छ जल से सुरक्षा हे महत्त्वकांगसी अभियान जल जिवन सर्वेक्षण २०२३ अंतर्गत “स्वच्छ जल से सुरक्षा “ या अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास या जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता) ए. एल. बोंद्रे, उपकार्यकारी अभियंता खडसे, पवार इतर पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
दि. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियान मिशन मोडमध्ये एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण करणे चा कालबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद हिंगोली च्या वतीने स्वच्छ जल से सुरक्षा अभियान अभियाना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्रोतांचे जिओ टॅगींग,पाणी गुणवत्ता परीक्षण,हर घर जल अँप्लिकेशनचे प्रशिक्षण, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने मान्सून पश्चात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करिता २३ डिसेंबर 2022 पर्यंत जलसुरक्षाका मार्फत पाणी नमुने गोळा करण्यात चे काम शंभर टक्के पूर्ण करून रासायनिक व जैविक यांनी तपासणीचा परिणामाच्या नोंदी एम आय च्या पोर्टलवर करणे व दूषित आढळणारा पाणी स्त्रोतांचे प्रति बंधात्मक उपायोजना करणे ही काम शंभर टक्के पूर्ण करणे. पाणी गुणवत्ता परीक्षण, पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी, WQMIS संकेतस्थळावर माहिती अद्यावत करणे.
तसेच FTK किटची उपलब्धता,जलसुरक्षक व प्रत्येक गावातील निवड केलेल्या 5 महिलांचे प्रशिक्षण व त्याद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी या सर्व बाबी अभीयान स्वरूपात दिनांक १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे.
“स्वच्छ जल से सुरक्षा” हे अभियान राबवून जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने सहभाग घ्यावा असे आव्हान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय दैने यांनी केले आहे.
विहित कालावधीत अभियान यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता,) श्री. ए.एल. बोंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली. जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार श्री. महेश थोरकर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष कक्षातील सर्व सल्लागार व तज्ञ यांचे सं नियंत्रणाखाली.