मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय हिंगोली, तालुका विधी सेवा समिती हिंगोली व सेतू सेवाभावी संस्था हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19/10/2022 रोजी सेतु सेवा भावी संस्था हिंगोली येथे समाजातील वंचित घटक असणाऱ्या महिलांसाठी कायदेविषयक कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी गजानन बोथीकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, दक्षता समितीच्या API धुळे, ऍड एम.एम. मोरे, व्ही. एस. सोनुने, महिला व बालविकासच्या ऍड. अनुराधा पंडित, वाठोरे, सेतू चे कार्यक्रम व्यवस्थापक रफिक, इरफान, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबीर मध्ये उपस्थित महिलांना ऍड मोरे यांनी आपल्या हक्क व कर्तव्याबाबत विस्तृत माहिती दिली, तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री ज्ञानेश्वर चौधरी यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल जेणेकरून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन आपला विकास होईल याबद्दल माहिती दिली.
तसेच पीडित महिलांना कायद्यानुसार योग्य ती मदत देण्याचे आश्वासन API धुळे मॅडम यांनी दिले, तर ऍड अनुराधा पंडित यांनी अनाथ मुलांकरीता बालसंगोपन योजना बाबत सविस्तर माहीती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेतूचे श्री रफिक सर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार सेतु चे प्रकल्प व्यवस्थापक इरफान कुरेशी यांनी केले.