मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेने चंदनाच्या लाकडा (गाभा)ची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना केसापूर फाटा येथे सापळा रुचून पकडले यावेळी त्यांच्याकडून 6 किलो चंदनाचे लाकूड (गाभा) किंमत 30 हजार रुपये मोटार सायकल असा एकूण एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ही वाहतूक करणाऱ्या कुरुंदा येथील दोघा आरोपींना पकडून त्यांच्यावर भादविसह कलम 41, 42 भारतीय वन अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील चंदन हे वसमत तालुक्यातून आणल्याची माहिती मिळतेय.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात 11 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे उघड करणे व अवैध धंद्याविरोधात कार्यवाहीसाठी पेट्रोलिंग करत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, कुरुंदा येथील राहणारे दोन इसम त्यांच्याकडील मोटारसायकलवर अवैधरित्या व विनापरवाना चंदनाचे गाभा असलेले लाकूड विक्रीसाठी वाहतूक करून घेऊन जात आहेत, अशी माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पेट्रोलिंग करत नरसी पोलीस ठाणे हद्दीतील केसापूर फाटा येथील रोडवर सापळा लावून हिंगोली – सेनगाव राज्य महामार्गावर संशयित मोटारसायकल पकडून तपासणी केली.
यावेळी सदर मोटार सायकलवर इसम नामे शेख अली शेख अहमद (वय 30 वर्ष), शेख अनवर शेख जानी (वय 35 वर्षे, दोन्ही राहणार नई आबादी मोहल्ला कुरुंदा ता. वसमत जि. हिंगोली) हे मिळून आले.
त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ एका पिशवीत अंदाजे 6 किलो चंदनाचा गाभा लाकूड मिळून आला पोलिसांनी नमूद चंदनाचा गाभा लाकूड 6 किलो (किंमत 30 हजार रुपये) व हिरो होंडा सीबीझेड मोटर सायकल (किंमत 80 हजार रुपये) असा एकूण एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नमूद दोन्ही आरोपीं विरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाण्यात गरनं 02/ 2024 कलम 379, 34 भादविसह कलम 41, 42 भारतीय वन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, शेख बाबर, विठ्ठल काळे, नागेश लेकुळे, विठ्ठल कोळेकर, ज्ञानेश्वर सावळे, अजित सौर, तुषार ठाकरे यांनी केली.