हिंगोली : संतोष अवचार /- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवार रोजी सोयाबीनचे दर साडेसहा हजार रुपयांच्या ही खाली आले, मात्र वेळ मिळाला सहा हजार रुपयांहून अधिक भाव मिळाला. तर हरभऱ्याचे दर स्थिर राहिले. हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 जून शनिवार रोजी 300 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळेस सोयाबीन ला 5900 रुपयांपासून 6175 रुपयांचा दर मिळाला तर चांगल्या सोयाबीनला 6 हजार 450 रुपयांचा दर मिळाला. तसेच बाजारपेठेत 250 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी हरभऱ्याला 3900 रुपयांपासून 4112 रुपयांचा दर मिळाला तर चांगल्या हरभऱ्याला 4325 रुपयांचा दर मिळाला हरभऱ्याचे दर स्थिर राहिले. शनिवार रोजी बाजार पेठेत एक हजार क्विंटल भुईमुगाची आवक झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात भुईमुगाची आवक झालेली असतानाही भुईमुगाला मात्र 5 हजार 500 रुपयांपासून 5815 रुपयांचा दर मिळाला तर चांगल्या भुईमुगाला 6 हजार 130 रुपयांचा भाव मिळाला. सध्या जून महिना सुरू असून खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे सोयाबीनचे दर खाली आले असून मार्मिक महाराष्ट्राचे भाकीत खरे ठरू लागले आहे. असे असले तरी सोयाबीनला किमान 7 हजार रुपयांचा दर मिळावा, अशी रास्त अपेक्षा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागली आहे.