मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष आठवले :-
ठाणे – महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त उल्हासनगर पोलीस ठाणे अंतर्गत शहरातील सामाजिक संस्था, सांस्कृतिक मंडळे, सेवाभावी संस्था, क्रीडा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मित्र मंडळ शाळा एक नंबर बस स्थानकाच्या मागे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास रक्तदात्यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने 518 बॅग रक्त संकलन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो. या निमित्ताने 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान ‘रेझिंग डे’ हा सप्ताह पोलिसांच्या वतीने आयोजित केला जातो.
या सप्ताहात सर्वांना कायदेविषयक आणि स्वसंरक्षणार्थ प्रात्यक्षिके करून दाखवून माहिती दिली. जाते तसेच जनजागृती केली जाते. भारत देश हा आपली शान आहे तर महाराष्ट्र पोलीस दल आपला अभिमान आहे.
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर शहरातील सामाजिक संस्था, सांस्कृतिक मंडळे, सेवाभावी संस्था, क्रीडा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 7 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात पोलीस दल हा आपला अभिमान आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी उल्हासनगर शहरातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद दिला तब्बल 518 बॅग रक्त संकलन करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती.