Marmik
Hingoli live

नियमित सकस आहार घेतल्यास कुपोषण दूर होते- डॉ.नामदेव कोरडे

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – मानवी जीवनामध्ये सकस आहाराला महत्त्व आहे. रोजच्या जीवनात हिरवे पालेभाज्या, कडधान्य तसेच आंबट, गोड,तिखट या सगळ्या चवीचा सकस आहार घेतल्यास कुपोषण दूर होते असे प्रतिपादन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांनी केले.

अंगणवाडीच्या माध्यमातून दि.१ ते ३० सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण अभियान राबविले जात आहे. त्या माध्यमातून नागरी प्रकल्प प्रमुख गणेश वाघ व मुख्य सेविका अंजली घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाच्या सहकार्याने दि. १४ सप्टेंबर बुधवार रोजी, मस्तानशहा नगर भागात पाककृती प्रदर्शन व सकस आहाराबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नामदेव कोरडे यांनी पौष्टिक व सकस आहाराबाबत मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा आनिता सूर्यतळ, समतादूत सुनिता आवटे यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ.कोरडे म्हणाले की, कुपोषण ही आपल्या देशाला लागलेली कीड असून बालकांचे व गरोदर मातांचे कुपोषण दूर करण्यासाठी सर्वांनी सांघिक प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी महिलांनी विविध पोषक खाद्यपदार्थ तयार करून आणले होते त्याचे प्रदर्शन भरण्यात आले होते.

यशस्वीतेसाठी उषा वाठोरे, रेखा तातड,संगीता कोरडे,शकुंतला दळवी, प्रतिभा कांबळे, शशिकला खडसे, संगीता गायकवाड, मीना मस्के, वैशाली सपकाळ, उषा देवकर यांच्यासह राजमाता जिजाऊ गट क्र.१ च्यासर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास परिसरातील गरोदर माता, किशोरवयीन मुली,बालके व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

आमदार संतोष बांगर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी पुजारी व पुरोहित घालणार श्रीनागनाथला साकडे

Santosh Awchar

कळमनुरी कडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता तयार, नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे जिल्हा प्रशासन आणि एमआरआयडीसी यांच्याकडून आवाहन

Santosh Awchar

व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल देशमुख तर उपाध्यक्ष पदी जगन वाढेकर

Gajanan Jogdand

Leave a Comment