मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / मनोज जयस्वाल :-
नंदगाव – औंढा नागनाथ तालुक्यातील श्री क्षेत्र गांगलवाडी येथील सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी 22 ऑगस्ट रोजी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी रांगेत उभे राहून सिद्धनाथ महाराजांचे दर्शन घेतले.
औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी येथील श्रीक्षेत्र सिद्धनाथ महाराजांचे जागृत देवस्थान मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात. त्यातच सध्या श्रावण महिना सुरू असून महिनाभर भाविकांनी येथे येऊन श्रीसिद्धनाथ महाराजांचे दर्शन घेतले.
आज 22 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील शेवटच्या श्रावण सोमवारी हजारो भाविकांनी श्रीक्षेत्र गांगलवाडी येथे दाखल होऊन सिद्धनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी रांगेत उभे राहून श्रीसिद्धनाथ महाराजांचे दर्शन घेतले. तसेच संस्थानचे आत्मानंद गिर महाराज यांचे देखील हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
सोमवार रोजी पहाटेपासूनच भाविकांनी येथे दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भावी भक्तांना सिद्धनाथ मंदिर संस्थांकडून अल्पोपहार व फराळाची सोय करण्यात आली होती.