Marmik
लाइफ स्टाइल

महिलांच्या आरोग्याचा मंत्रा ‘अंतरा’!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / हिंगोली :-

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया न करता नको असलेल्या गर्भधारणेसाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. एकदा इंजेक्शन घेतल्यानंतर तीन महिने गर्भधारणेची चिंता महिलांना राहणार नाही.

लग्नानंतर पहिले आपत्य उशिरा व्हावे यासाठी किंवा दोन आपत्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी बऱ्याचदा महागड्या औषधांचा वापर केला जातो. मात्र, आता नको असलेल्या गर्भधारणेपासून सुटका मिळण्यासाठी सोपा आणि सुरक्षित उपाय उपलब्ध झाला आहे. 

अंतरा टोचले की नो टेन्शन : हे इंजेक्शन एकदा घेतले की तीन महिन्यापर्यंत गर्भधारणा राहणार नाही. अंतरा इंजेक्शन मुळे महिलांचा रक्ताक्षय व बीजांडाच्या कर्करोगापासून बचाव होतो. तसेच लैंगिक संबंधावर प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. 

मोफत टोचून घ्या इंजेक्शन : अंतरा हे इंजेक्शन बंद केल्यानंतर गर्भधारणा होण्यास सात ते दहा महिन्याचा कालावधी लागू शकतो कुटुंब नियोजनासाठी अंतरा इंजेक्शन घेणे हा चांगला पर्याय आहे. सर्व शासकीय रुग्णालयात हे इंजेक्शन मोफत दिले जाते व उपलब्ध आहे.

स्तनदा मातासाठी उपयुक्त :गर्भपात करण्यापेक्षा गर्भनिरोधक गोळ्याचा वापर वाढावा, यादृष्टीने कुटुंब कल्याण विभागाने या इंजेक्शनच्या वापरासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. इंजेक्शनचा वापर थांबल्यानंतर सात ते दहा महिन्यानी  गर्भधारणा होऊ शकते. प्रसूतीनंतरच्या कालावधीत  स्तनदा मातासाठीही उपयुक्त आहे.

गर्भनिरोधक गोळ्यापेक्षा सोपे : तीन महिन्यातून एकदा, वर्षातून चार वेळेस अंतरा इंजेक्शन घेतल्यास गर्भधारणा रोखली जाणार आहे. गर्भनिरोधक गोळ्यामध्ये एखादी गोळी घेणे चुकल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. मात्र, अंतरा इंजेक्शनमुळे हे टाळता येणे शक्य आहे. 

अंतरा हे इंजेक्शन अगदी सुरक्षित : लग्नानंतर पहिले आपत्य उशिरा व्हावे यासाठी  किंवा दोन अपत्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी बऱ्याचदा महागड्या औषधाचा वापर केला जातो. नको असलेल्या गर्भधारणेपासून सुटका मिळण्यासाठी सोपा सुरक्षित उपाय आहे.

– अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर.

अंतरा हे इंजेक्शन कोठे मिळेल ? हिंगोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत हे इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपल्या नजीकच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेत जाऊन हे इंजेक्शन घ्यावे. कुटुंब नियोजनासाठी महिलांना शस्त्रक्रियेबरोबरच दुसरा सोपा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. शस्त्रक्रिया न करता नको असलेले गर्भधारणेसाठी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत अंतरा इंजेक्शन मोफत उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. 

– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार.

Related posts

परत वारी : संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी नरसीत अवतरली पंढरी!

Santosh Awchar

कवठा येथील जागृत जगदंबा मातेचे मंदिर

Gajanan Jogdand

घोटा येथील आई तुळजाभवानीचे जागृत देवस्थान

Gajanan Jogdand

Leave a Comment