Marmik
Hingoli live

मराठवाडा मुक्ती संग्राम : संबंधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा 74 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, तहसीलदार नवनाथ वगवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे आणि सर्व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम 17 सप्टेंबर रोजी  सकाळी 8.40 वाजता देवडा नगर येथील नगर परिषद उद्यानात उभारलेल्या स्मृतीस्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल व त्यानंतर तेथेच सकाळी 9.00 वाजता राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे.

तसेच दि. 17 सप्टेंबर, 2022 पासून संपूर्ण मराठवाड्यासह जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे.

यानिमित्त दि. 17 सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य सैनिकांच्या गृहभेटी, आरोग्य शिबीर, शाळा परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रम, घरकुलाचा ताबा सुपूर्द करणे, अपंगाचा निधी वाटप कार्यक्रम, रुप वॉटर हार्वेस्टींग आदी विविध उपक्रम घेण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या. 

कार्यक्रम स्थळी नागरिकांच्या आसनाची व्यवस्था, परिसर स्वच्छता, आणि सॅनिटायझेन करण्याची जबाबदारी नगर परिषदेची असेल. लाऊड स्पीकर व शामियाना लावण्याबाबत कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने तर विद्युत विभागाने त्या दिवशी विज पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी.

तसेच कार्यक्रमस्थळी आरोग्य पथक आणि रुग्णवाहिका तत्पर असणे अपेक्षित असल्याचेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी सांगितले.

Related posts

शेतकऱ्याने लावली गांजाची झाडे ! गांगलवाडी येथे दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही

Santosh Awchar

पालकमंत्र्यांशिवाय होणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे ध्वजारोहन

Gajanan Jogdand

…अन भाऊराव पाटलांनीही थोपटले दंड! जनता, कार्यकर्त्यांना वाटू लागले हायसे

Gajanan Jogdand

Leave a Comment