Marmik
News महाराष्ट्र

मी आणि माझं सरकार 24तास शेतकऱ्यांसोबत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना भावनिक साद; पत्र व्हायरल

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / गजानन जोगदंड :-

हिंगोली – शेतकरी आत्महत्या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना भावनिक साद घालत मी आणि माझा सरकार सतत 24तास शेतकऱ्यांसोबत आहे. याची शेतकऱ्यांनी खात्री बाळगावी. जीव देन बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना… अशा आशयाचे पत्र ट्विटर या समाज माध्यमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर हँडल वरून प्रसारित झालं आहे.

महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतः चच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचेही काम करत आहात. म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कुणाचा असेल तर तो तुम्हाला शेतकरी बांधवांचा आहे. परंतु अचानक नैसर्गिक कौटुंबिक आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होतांना पाहून मन कासावीस होऊन जातं.

तुमच्यातल्या काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात. हे चित्र पाहून माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषन्न होऊन जातं. वाटतं की, आपल्याच घरातलं कोणी आपण गमावलं…

लक्षात घ्या माझ्या शेतकरी भावांनो तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्या इतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे रडायचं नाही लढायचं…

शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका. आत्महत्या करू नका. मी तुमच्या सारखाच रांगड्या मनाचा सरळ साधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात काळजाला भिडतात या अस्मानी संकटातून या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघात आत पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखत यश सामावलेलं असतं…

मी आणि माझं सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे. याची खात्री बाळगा जीव देणे बंद करूयात जीव लावू यात एकमेकांना चला नव्या सूर्याची नवी किरण गाठीशी बांधून यात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया. असे या पत्रात म्हटले आहे.

Related posts

Hingoli समगा येथील कयाधू नदीवरील पूल पाण्याखाली, दहा गावांचा संपर्क तुटला

Santosh Awchar

जिल्हा परिषद भरती: आवेदन शुल्कासाठी तरुणाने बँकेकडे मागितले 50 हजार रुपयांचे कर्ज!

Santosh Awchar

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सविताचं जाण…

Gajanan Jogdand

Leave a Comment