हिंगोली : संतोष अवचार
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 (सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम -5) चे कलम 9 (1) अन्वये मा. राज्य निवडणूक सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी केलेल्या अधिसूचना क्र.रानिआ/जिपपंस-2021/प्र.क्र.10/का-7, दि. 10 मे, 2022 च्या आदेशान्वये हिंगोली जिल्हा परिषदेच्या बाबतीत निवडावयाची सदस्य संख्या 57 इतकी निश्चित करण्यात आली आहे. तसेच हिंगोली पंचायत समिती 22, कळमनुरी पंचायत समिती 24, सेनगाव पंचायत समिती 22, औंढा पंचायत समिती 20, वसमत पंचायत समिती 26 अशी एकूण 114 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.
वरील आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम-1961 (सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम-5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उक्त जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती क्षेत्र जितक्या निवडणूक विभागात विभागण्यात येईल त्या निवडणूक विभागाची संख्या व व्याप्ती, निर्वाचक गणाची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित केले आहेत. हे आदेश तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हे आदेश अंमलात येतील, असेही आदेशात नमूद केले आहे.
हे आदेश व अनुसूची हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसील कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालयातील फलकावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.