मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजा बाजार येथे समाजातील उच्च शिक्षीत सि.ए इंजिनियर, डॉक्टर, वकिल, सी.एस. तसेच १० वी १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार समारंभ अयोजीत करण्यात आला होता.
या वेळी विद्यार्थांना सन्मान पत्र व समाजातील स्व. झेड. एच. चुडीवाल स्व. सुशिलादेवी कासलीवाल स्व. हिरालाल पाटणी (हिराखानवाले) स्व. कल्याणमल गंगवाल, स्व. रत्नमाला पाटणी, स्व. जनाबाई पाटणी, बसंताबाई पाटणी, श्रदा चुडीवाल
ताराबाई चुडीवाल, वासल्याबाई चुडीवाल या मान्यवरांच्या वतीने दरवर्षी दिली जानारी शिषवृर्तीची रक्कम तसेच सुमित पाटणी यांच्या डायटोरा कंपनीचे हेडफोन देण्यात आले.
या समारंभात राजा बाजार जैन मंदिराच्या स्थापनेपासुन १९३२ ज्या व्यक्ती विषेशानी अध्यक्ष व सचिव व विश्वस्त
पद भुषवलेले आहे अशा मान्यवरांचा व जे अध्यक्ष सचिव विश्वस्त हायात नाहीत आशा सदस्यांच्या परिवारातील व्यक्तींचा
सन्मान व समारंभ या वेळी संपन्न झाला.
तसेच मंदिराच्या १२ महिन्यांचा अष्ठद्वाव्यांचा ज्या बोल्या आहे त्या बोल्या घेणाऱ्या परिवाराचाही यावेळी भगवान शांतीनाथाचे स्मृती चिन्ह देवून सन्मान करण्यत आला होता. सर्वप्रथम सुर्या पापडीवाल यांच्या मंगला चरणाने कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली. तद नंतर दिप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराजजी बोरा सकल मारवाडी महासभेचे डॉ. अध्यक्ष पुरूषोत्तम दरक, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी नगरसेवक जगदिश सिध्द, पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश
अजमेरा, विश्वत अॅड. यतिन ठोले, अरूण पाटणी, अॅड. डी.बी. कासलीवाल, मानिकचंद गंगवाल, डी.बी. पहाडे,
अनिला ठोळे, हेमा सेठी, चंदा कासलीवाल, निता ठोळे, सुरेखा पाटणी, सुर्या पापडीवाल, अॅड. अनिल कासलीवाल,
अशोक गंगवाल, राजेद्र शेठी, महावीर चांदीवाल, संजय पापड़ीवाल, कल्याणमल दगडा, प्रकाश कासलीवाल, संतोष
शेठी, जितेंद्र पाटणी, सुरजमल पाटणी व संजय रतनलाल लोहाडे जयकुमार कासलीवाल, तनीक्ष शेठी, अदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रकाश अजमेरा यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी १९३२ पासून मंदिराच्या
उन्नतीसाठी ज्या ज्या परिवारांनी आपले योगदाने दिले. आशा परिवाराची ओळख त्यांनी सर्व समाज बांधवाना करून दिली.
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराजजी बोरा, सकल मारवाडी महासभेचे डॉ. अध्यक्ष पुरूषोत्तम
दरक व पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी यानी आपले मनोगत व्यक्त केले. या तिघांनी आपल्या मनोगतात मंदिरा विषयी
माहिती विषद करून क्षमावानी पर्व निमित्त् आपली माहिती सभे समोर मांडली.
तद नंतर पर्युषन पर्वात १० दिवसीय इंद्र इंद्रानी असलेले अॅड. अनिल व अल्का कासलीवाल यांच्यसह १९७९ साली
मंदिराच्या पंचकल्यान प्रतिष्ठेत सौधर्म इंद्र इंद्रानी झालेले प्रकाश व चंदा कासलीवाल यांचाही यावेळी येथोचीत
सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालक अॅड. यतीन ठोळे यानी केले.
यावेळी शेकडो भाविकांची मोठी उपस्थिती होती, अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यांनी दिली