मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – मध्यान जेवण निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याचे हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या निदर्शनास आले. यावरून त्यांनी हिंगोली जिल्हा कामगार अधिकारी कराड यांना चांगलेच खडसावले.
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी हिंगोली जिल्ह्यातील कामगारांकरिता चालू असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेच्या स्वयंपाक गृहात जाऊन भोजनाची पाहणी केली असता जिल्हा कामगार अधिकारी कराड हे ऑफिसमध्ये नव्हते. तसेच नियमाप्रमाणे डब्यात जेवण देखील नव्हते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत निकृष्ट दर्जाचे चणाडाळ, तुरदाळ, मटकी, चवळी, तांदूळ वापरण्यात येत होते.
तसेच चपात्या देखील करपलेल्या होत्या. आणि कागदोपत्री 48 हजार कामगारांना भोजन पूरवत असल्याचे दाखवून खूप कमी कामगारांना भोजन तेही निकृष्ट दर्जाचे पुरवल्या जात असल्याचे आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जिल्हा कामगार अधिकारी कराड यांना दूरध्वनीवरून सदर प्रकारावरून चांगलेच खडसावले व कामगारांच्या जीविताशी खेळल्यास परिणाम वाईट होतील असा इशारा देखील दिला आणि लवकरात लवकर मध्यान्ह भोजनेतील सावळा गोंधळ दूर करून कामगारांना दर्जेदार जेवण पुरवण्यास सांगितले व दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यास देखील सांगितले.
कामगारांची काळजी करणारा हिंगोली जिल्ह्यातील देवदूत म्हणजे आमदार संतोष (दादा) बांगर अशी चर्चा होत आहे.