मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात 22 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे परिसरातील ग्रामस्थात भीतीचे वातावरण असून जिल्हा आपत्ती कार्यालयाची टीम अद्याप या भागात पोहोचलेली नाही.
वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात 22 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परिसरातील वापटी, शिरळी, पांगरा शिंदे, दोनवाडा, कोठारी, वाडी, सेलू, आंबा, खादनापूर व कुरुंदा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यात कोणतीही हानी झाली नाही. यामुळे ग्रामस्थात भेटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पांगरा शिंदे परिसरात नेहमीच गुड आवाज येतात.
तसेच भूकंपाचे अनेक छोटे-मोठे संवेदक केली बसत असतात. 22 डिसेंबर रोजी जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या भागाची तलाठी यांनी पाहणी केली, मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी कर्मचारी अद्याप येथे दाखल झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
या भागात नेहमी भूकंपाचे संवेधक्के व गुढ आवाज जाणवत असल्याने विषय चर्चेचा झाला आहे.