हिंगोली : संतोष अवचार
शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघात लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ मंदिरातील सर्व पुजारी व पुरोहित मंडळी श्रीनागनाथला साकडे घालणार आहेत. तसेच आषाढी एकादशीनिमित्त श्रीनागनाथ यांची महापूजा करण्यासाठी त्यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. तसेच आमदार संतोष (दादा) बांगर यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.
आज 10 जुलै रोजी आमदार संतोष (दादा) बांगर यांनी आषाढी एकादशी निमित्त औंढा नागनाथ येथे जाऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक महापूजा केली. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल – रुक्मिणी कडे शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे व महाराष्ट्रात सुख, शांती नांदू दे असे साकडे त्यांनी घातले. यावेळी तहसीलदार कृष्णा कानगुले, नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, अनिल देशमुख, रामजी नागरे, श्रीराम राठी, अनिल देव, विष्णू पवार, राहुल पवार, प्रदीप कनकुटे, मनोज देशमुख, दिलीप राठोड, लक्ष्मण पवार, बाळू तेली, सचिन राठोड, लल्ला देव, माधव गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.