Marmik
Hingoli live

कळमनुरी तालुक्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी खेचून आणणार – आमदार संतोष बांगर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी कळमनुरी पंचायत समिती तर्फे आयोजित महा आवास अभियान तालुकास्तरीय पुरस्काराचे वाटप मोठ्या थाटात संपन्न झाले.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टर, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट घरकुल आदी पुरस्काराचे वाटप आ.संतोष बांगर साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार संतोष (दादा) बांगर म्हणाले की तालुक्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी खेचून आणणार आहे तेव्हा अधिकारी वर्गांनी सुद्धा जनतेस सहकार्य करून तालुक्याचा विकास होण्यासाठी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले पाहिजे. तसेच यावेळी आमदार बांगर यांनी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतचे व लाभार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले.

यावेळी माजी जि.प.समाजकल्याण सभापती फकिरा मुंढे, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, गटविकास अधिकारी श्री प्रदीप बोंढारे साहेब, जि. प.सदस्य विठ्ठल राव चौतमाल, उत्तमराव शिंदे, आपाराव शिंदे, दत्ता बोंढारे, संभाजी सोनुने, नामदेव कर्हाळे, पंढरी मगर,नितीन होकर्णे, राजू नागरे, मयूर शिंदे, शिवराज पाटील, बबलू पत्की, आर आर पाटील,पतंगे साहेब,मठपती साहेब,गणेश इंगोले,पिंटू गडदे,शिवम नाईक,रवी शिंदे,सचिन पंचलिंगे, बंटी चवात, लल्ला होडबे, सचिन व्यवहारे, किशोर भालेराव, श्रीमती नरवाडे, माळेगाव सरपंच श्री बर्गे,तसेच मौजे येहळेगाव तु., माळेगाव,दांडेगाव, कळमकोंडा खु., देवजना,शेवाळा,घोडा व इतर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत चे सरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

व्हाइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी जगन वाढेकर, सेनगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

Gajanan Jogdand

पालकमंत्र्यांशिवाय होणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे ध्वजारोहन

Gajanan Jogdand

उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्यासह सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा निरोप समारंभ

Gajanan Jogdand

Leave a Comment