हिंगोली : प्रतिनिधी /-
मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्यातील आरोपी च्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कामगिरी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने केली.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी सागर रुस्तुम काळे व इतर आरोपींवर विविध प्रकारचे शरीरा विरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांच्या आदेशाने नमूद गुन्ह्यात मोक्का कायदा कलमांचे वाढ करण्यात आले होते. गुन्ह्यात सहभागी आरोपी अक्षय संजय गिरी व करण गजेंद्रसिंह ठाकूर यांना यापूर्वी अटक करण्यात आली. असून गुन्ह्यात सहभागी मुख्य आरोपी सागर रुस्तुम काळे व विकी काळे हे गुन्हा झाल्यापासून फरार होते. तसेच पोलिसांच्या हाती लागत नव्हते नमूद आरोपींना शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस ठाणे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रयत्न करत होते. आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणी जाऊनही आले होते.
आरोपीच्या शोधाबाबत शहरात मुख्य ठिकाणी त्यांच्या फोटोसह नावांची प्रसिद्धीही दिली होती. नमूद आरोपी हे मोबाईल न वापरता सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. त्यातच आरोपी हा औरंगाबाद व सेलू परिसरात असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथके नमूद ठिकाणी जाऊन सायबर सेल व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने नमूद आरोपीचे मागावर असतानाच काही वेळासाठी नमूद आरोपी हा हिंगोली शहरात आल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय शिताफीने सापळा लावून आरोपी सागर रुस्तुम काळे यास ताब्यात घेतले. गुन्ह्याचे तपासी अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडी रिमांड मंजूर केले असून आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहे.
ही कारवाई हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिष देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, अंमलदार बालाजी बोके, संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, किशोर सावंत, विठ्ठल काळे, आकाश टापरे, विठ्ठल कोळेकर, सुमित टाले, प्रशांत वाघमारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.