मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / सतीश खिल्लारी :-
सेनगाव – मागील काही दिवसांमध्ये सेनगाव व गोरेगाव परिसरातील विद्युत मोटार पंप चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्या अनुषंगाने हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर गुन्ह्याचा छडा लावण्या संदर्भात पोलीस निरीक्षक यांना सूचना दिल्या होत्या.
दि. 16/ 5 /2023 रोजी पोलीस स्टेशन सेनगाव अंतर्गत बोरखेडी शेत शिवारातील पाणबुडी मोटार चोरी गेल्या संदर्भाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की हिवरखेडा येथील मोहन डाखोरे हा किसान सदरची मोटार चोरला आहे. त्या अनुषंगाने सदर रघुनाथ मोहन डाखोरे या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी बोरखेडी शेत शिवारातील मोटारपंप चोरल्याचे कबूल करून सदरची मोटार काढून दिली.
तसेच यापूर्वी गोरेगाव हद्दीमध्ये सुद्धा चोरी केल्याचे कबूल केले , त्यावरून पोलीस स्टेशन सेनगाव व पोलीस स्टेशन गोरेगाव हद्दीतील दोन गुन्हे उघड करून चोरीचा मुद्देमाल विद्युत पाणबुडी मोटार किंमत अंदाजे 25,000 ही जप्त करुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर , अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थागुशा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे , पोलीस अंमलदार लिंबाजी वाव्हळे, ज्ञानेश्वर पायघन, गणेश लेखुळे यांच्या पथकाने केली आहे.