मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 28 जुलै रोजी दुपारी तीन वाजता हिंगोली नगर परिषद कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांची उपस्थिती होती.
प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे – प्रभाग क्रमांक 1 अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 2 अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 अ सर्वसाधारण महिला ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 5 अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 6 अ सर्वसाधारण महिला नागरीकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 7 अ सर्वसाधारण महिला ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 8 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 11 अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 12 अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 13 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 14 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 15 अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 16 अ अनुसूचित जमाती महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 17 अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण असा निश्चित करण्यात आला आहे.
आरक्षण सोडत तिच्या अनुषंगाने हरकती व सूचना यांसाठी 29 जुलै ते 1 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे घेता येऊ शकतील असे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी घोषित केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगरसेवक शेख निहाल, अनिल नेनवाणी, शेख शकील, माबुद बागवान, जावेद राज आदींसह नागरिक उपस्थित होते.
तसेच या आरक्षण सोडती वेळी उपमुख्य अधिकारी उमेश हेंबाडे, श्याम माळवतकर, डी.बी. ठाकूर, कपिल धुळे, रविराज दरक, वसंत पुतळे, अनिकेत नाईक, विनय साहू, पंडित मस्के, एजाज पठाण, बी. टी. काळे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.