Marmik
Hingoli live क्राईम

ईसापुर रमना येथील महिलेचे खून प्रकरण; आरोपी पतिवर गुन्हा दाखल

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – तालुक्यातील बासंबा पोलीस ठाणे हद्दीतील ईसापुर रमणा येथे पतीने पत्नीस दगड मारून खून केल्याची घटना 2 ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी काल गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र आज फिर्यादी गोरखनाथ पि. दत्ता कराळे यांच्या फिर्यादीवरून बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मार्मिक महाराष्ट्रा’चे वृत्त खरे ठरले आहे.

हिंगोली तालुक्यातील ईसापुर रमना येथील आरोपी पती माधव यशवंतराव जगताप यांनी 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्याची पत्नी द्वारकाबाई माधव जगताप (वय 42 वर्ष) हिला वेळेवर जेवण का बनविले नाही

या कारणावरून मनात राग धरून त्याला हे माहीत असतानाही दगड फेकून मारल्याने त्याच्या पत्नीचा जीव जाऊ शकतो, असे असताना त्याने त्याच्या पत्नीस दगड फेकून मारला.

सदरील दगड हा त्याची पत्नी द्वारकाबाई जगताप यांच्या छातीवर लागल्याने मरण पावली. तिच्या मृत्यूस तिचा पती माधव यशवंतराव जगताप हा कारणीभूत झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

घटना घडल्यानंतर बसंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी व पोलीस उपनिरीक्षक जी.एल. खरात यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. ‘मार्मिक महाराष्ट्र’ मध्ये 2 ऑक्टोबर रोजी सदरील वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र आरोपीचे नाव गुन्हा दाखल झाल्यानंतर समजू शकले आहे.

Related posts

हिंगोली पंचायत समितीत कागदाचा तुटवडा! नागरिकांना कोरे कागद मिळेनात

Gajanan Jogdand

चार चाकी वाहन चोरणाऱ्या चोरट्यास ठोकल्या बेड्या; उद्धव ठाकरेंच्या सभेवेळी केली होती चार चाकी लंपास!

Gajanan Jogdand

आमदार संतोष बांगर यांनी घेतला डॉक्टर बगडीयाचा खरपूस समाचार, मयताच्या नातेवाईकांकडून पैशांची लुबाडणूक

Santosh Awchar

Leave a Comment