मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – अनैतिक संबंधाच्या कारणावरून हिंगोली तालुक्यातील पांगरी येथील दोघांतील हत्या केल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मयताचे प्रेत नदीत फेकून दिले. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथील आरोपी व्यंकटी गोविंदा मस्के (42 वर्ष जात मराठा), ज्ञानेश्वर बबन गिरे (26 वर्ष जात आदिवासी), संतोष नामदेव पाणबुडे (45 वर्षे जात आदिवासी) आशाबाई बबन गिरे (वय 42 वर्षे, जात आदिवासी) या चौघांनी सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारा पासून ते 7 ऑगस्ट रोजीच्या 12 वाजेच्या दरम्यान बरडा पिंपरी शिवारातील नदीच्या पाण्यात हरिदास वकटूजी टापरे हे अनुसूचित जातीचे आहेत हे माहिती असताना सुद्धा आरोपींनी अनैतिक संबंधाच्या कारणावरून कोणत्यातरी धारदार शस्त्राने या दोघांचा गळा कापून व डोक्यावर, कपाळावर कोणत्यातरी हत्याराने मारून जीवे ठार मारले.
तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बरडा पिंपरी शिवारातील नदीच्या पाण्यात फेकून दिले. या प्रकरणी अरविंद पिता हरिदास टापरे (वय 22 वर्षे व्यवसाय शेती जात बौद्ध, रा. पांगरी ता. जि. हिंगोली) यांच्या फिर्यादीवरून आरोपी व्यंकटी गोविंदा मस्के, ज्ञानेश्वर बबन गिरे, संतोष नामदेव पानबुडे, आशाबाई बबन गिरे या चौघांविरुद्ध भादवि सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे हे करत आहे. आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.