Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रोजगार व स्वयंरोजगार सेल जिल्हाध्यक्ष पदी अकबर अख्तर शेख

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित गट) जिल्हाध्यक्ष अभिजित भैय्या देशमुख यांच्या शिफारसीने सेवापथ सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अकबर अख्तर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या प्रदेश अध्यक्ष मेघाताई पवार, प्रदेश सरचिटणीस डॉ. महीबुब सय्यद, तसेच अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष रफिक यांची उपस्थिती होती.

शहरातील व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त सामाजिक संस्था,एनजीओ, ऑर्गनायझेशन याना एकत्रित करून सुशिक्षित बेरोजगार तसेच तरुण वर्गांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असेल असे शेख अकबर यांनी बोलून दाखवले.

महिला व बचत गट यांच्या साठी गृह उद्योग सुरू करून त्यांन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त शासकीय योजना जनसामान्य पर्यंत पोहचवण्यासाठी ते कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून व विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थेद्वारे, कामगार बांधवाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related posts

वाराई कामास प्रतिबंध : छत्रपती संभाजीनगरात पणन संचालकाचा निषेध

Gajanan Jogdand

गॉडफोड्रिक इंटरनॅशनलचे माय सुपर ॲप लाँच; स्थानिक व्यवसायांसाठी डिजिटल क्रांती

Gajanan Jogdand

नवी उभारी, उंच भरारी”; ‘कलर्स मराठी’चा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला

Gajanan Jogdand

Leave a Comment