सेनगाव : पांडुरंग कोटकर /-
तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत योगा करून योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.आपल्या शरीराला शास्त्रीय पद्धतीने सशक्त करण्याचे आणि निरोगी आरोग्य राखण्याचे योग हे महत्वपूर्ण साधन आहे.आपल्या गौरवशाली संस्कृती आणि इतिहासाचा अविभाज्य भाग आहे, ही आपली संस्कृती आता जगाने स्वीकारली आहे. मनाचे आरोग्य राखणारी योग साधना सर्वांनी करावी. यावेळी ग्रामसेवक सपकाळ, मुख्याध्यापक शिंदे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले, धडवाई, जाधव, भोणे, चव्हाण, गोटे, मेहकरे , श्रीमती जगताप मॅडम, श्रीमती सरनाईक , ऑपरेटर साईराम मस्के आदी विद्यार्थी उपस्थित होते.