Marmik
Hingoli live Love हिंगोली News

कधीही या कार्यालय बंदच; हिंगोली तलाठी कार्यालयाचा भोंगळ कारभार

हिंगोली : संतोष अवचार

येथील तलाठी कार्यालयात काम काढून कधीही या हे कार्यालय सर्वसामान्यांसाठी नेहेमीच बंद असते. कार्यालयाच्या भोंगळ कारभाराची शहरात मोठ्या चवीने चर्चा होत आहे. तलाठी कार्यालय बंद करून क्षणाक्षणाला जातात कुठे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

हिंगोली येथील तलाठी कार्यालय सध्या तलाठी असूनही सर्वसामान्यांसाठी बंदच राहता हे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना तलाठी येईपर्यंत गेट च्या पुढे वाट पाहत बसावे लागत आहे. 8 जुलै रोजी शहरातील काही नागरिक उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कार्यालयात आले असता सदरील कार्यालयास कुलूप असल्याने गेटच्या बाहेर बसलेले दिसून आले. विशेष म्हणजे काही नागरिकांनी तलाठी साहेब आले होते मात्र पुन्हा कुठेतरी गेले असे सांगितले हे नागरिक दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांना तलाटी साहेबांची वाट पाहत बसलेले दिसून आले. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून कार्यालयाचे तलाटी हे क्षणाक्षणाला कार्यालय बंद करून कुठेतरी निघून जातात असे काही नागरिकांनी सांगितले. तलाठी साहेब हे क्षणाक्षणाला कोणत्या दौऱ्यासाठी जातात असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला असून तहसीलदार यांनी त्यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणीही काही नागरिकांतून होत आहे.

तसेच शासनाने निर्धारित केलेल्या वेळेत तलाठी साहेबांनी थांबून सर्वसामान्यांची सेवा करावी. निर्धारित वेळेत भोजनाची मधली सुट्टी वगळता त्यांनी कार्यालय बंद ठेवू नये याबाबत त्यांना आदेशित करावे व सर्वसामान्यांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणीही केली जात आहे.

Related posts

मानव विकासची बस वेळेवर येईना; विद्यार्थिनींना करावी लागते पायपीट! बस फेऱ्या वाढविण्याची मागणी

Santosh Awchar

सोसाट्याच्या वाऱ्याने नूतन बस स्थानकाचे पत्रे कोसळली! सिलिंग फॅनही तुटून पडला

Gajanan Jogdand

डायल 112; माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल! खोटे सांगितले

Santosh Awchar

Leave a Comment