मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – ज्या आजारांना असाध्य असे लेबल लावले आहे व हे आजार कायमचे बरे नाही होऊ शकणार असे बोलले जाते ते सर्व आजार बरे होऊ शकतात हा विश्वास सर्व प्रथम निर्माण करण्याचे कार्य डॉ. नीलेश पाटील व डॉ. अपेक्षा पाटील यांनी समाजात निर्माण केला आहे. “निब्बाना” उपचार पद्धतीने एक अध्यात्मिक, योगिक पद्धतीने आपल्या आजाराचे निदान केले जाते, असा विश्वास आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.निलेश पाटील व डॉ.अपेक्षा पाटील यांनी गुरुवारी (दि.७) व्यक्त केला.
रुग्णांचा सर्वांगाने अभ्यास केल्यानंतर त्याच्या व्याधीचे निदान करून चिकित्सामार्ग ठरविला जातो. छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असणाऱ्या आश्रमाच्या प्रसन्न निसर्गाच्या वातावरणात रुग्ण पहिल्या ७ दिवसाच्या निवासी उपचारात व्याधी मुक्तीचा अनुभव घेऊ लागतो.
छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रामध्ये एकूण ८ ठिकाणी ही सेवा उपलब्ध असून काय आहे “निब्बाना” उपचार पद्धती याबाबत डॉ.निलेश पाटील व डॉ.अपेक्षा पाटील यांनी आपले अनुभव यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सर्व साध्य व असाध्य आजार आपण बरे करू शकतात.
हृदयरोगामध्ये बायपास, अँजिओप्लास्टी टाळणे, कायमची डोकेदुखी, मायग्रेन, दमा, कायमची सर्दी, वंध्यत्व, संधीवात, स्पॉंडिलोसिस, सोरायसीस, स्थुलत्व, डायबेटिस, रक्तदाब, डिप्रेशन, पोटदुखी, अल्सेरोटिव्ह, कोलायटीस, हिपाटायटीस बी हे व यासारखे असंख्य आजार बरे झाले आहेत व आपण बरे करू शकतात.
आजारांना बरे करण्याशिवाय व्यक्ती कायमचा आनंदी, यशस्वी होण्यासाठी विविध प्रकारचे वर्कशॉप्स, सेमीनार्स घेतले जातात.त्याशिवाय आधुनिक गर्भसंस्कार, बालसंस्कार, ध्यानधारणा,काऊन्सिलिंग, पंचकर्म, नॅचरोपथि, फिजिओ थेरपी, स्ट्रेस मॅनेजमेंट, लीडरशिप प्रोग्राम घेतले जातात. रुग्णमित्र प्रवेशित झाल्यापासून विश्वांजुपूरम मधील प्रसन्न नैसर्गिक, शांत वातावरणात प्रात:काळापासून सायंकाळपर्यंत एक विशिष्ट पद्धती जगतो.
सकाळची निब्बाना हर्बल टी पासून प्राणक्रिया, योग, व्यायाम, हास्ययोग, काऊन्सिलिंग, निसर्गोपचार, सूर्यस्नान, पंचकर्म, निब्बाना विशेष आहार, विहार, ध्यानमंदिरातील विविध ध्यान, चर्चासत्रातून रुग्ण नवीन रुपांतरन चा अनुभव घेतो.
छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रामध्ये एकूण ८ ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे. पंरतु, कोणत्याही सेवा घेण्यापूर्वी प्रथमच काही दिवस निब्बानाचा विश्वांजुपूरम राहणे आवश्यक असते. अशाप्रकारे आधुनिक, शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही उपचार करून समाजामध्ये एक आनंदी तत्व, निरोगी तत्व व यशस्वी माणसे निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.
जगातील सर्व लोकांना याचा लाभ व्हावा म्हणून प्रचार, प्रसार करत आहोत. अशा या दैवी, समाजकार्यासाठी आम्हाला असंख्य माणसे, संस्था, ग्रुप्स यांची आवश्यकता आहे. आपण रुग्ण म्हणून सेवा घेऊ शकतात. येथील कोर्सेस करून आनंदी होऊ शकतात. यशस्वी होऊ शकतात किंवा विविध शहरांमध्ये आमचे सहकारी /फ्रांचाएझी होऊ शकता.
यासाठी आपल्या आमच्या क्रमाकावर Whatsapp मेसेज करावयाचा आहे. आपण www.nibbana.in या वेबसाईटवर भेट देऊन इन्क्वायरी फॉर्म भरू शकता याशिवायआपण युट्यूबव चॅनल ‘निब्बाना’ ला भेट देवून अधिक माहिती घेवू शकता. जीवन जगताना कुणालाही आजारी पडणे आवडत नाही, परंतु आचार, विचार, अपथ्ये, जीवनशैली, चिंता, धावपळ,स्पर्धा इ. अनेक कारणांनी जेव्हा आपण आजारग्रस्त होतो तेव्हा आपण चिकित्सेसाठी डॉक्टरांकडे जातो.
आपला आजार बरा होण्यासाठी आपण तत्सम पॅथी, डॉक्टरांकडे जेव्हा जातो तेव्हा आपला उद्देश आजार कायमचा बरा होणे हा असतो पण असे आजार कायमचे बरे होत आहेत का? जर असे असेल तर एवढी मोठ्या संख्येने माणसे का मरत आहे ?
सरासरी आर्युमान कमी का होत आहे? समाज मनामध्ये पहिल्यापेक्षा अशांतता का वाढली आहे ? हे प्रश्न मला गेली २४ वर्ष डॉक्टर रुपाने काम करताना पडले व त्यातून ही निब्बाना जीवन पद्धतीची निर्मिती झाली. असे डॉ.निलेश पाटील व डॉ.अपेक्षा पाटील यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.