Marmik
News

पीक कर्ज मिळेना; त्रस्त शेतकऱ्याने बँकेतच केला आत्महत्येचा प्रयत्न!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत 20 सप्टेंबर रोजी एका शेतकऱ्याने बँकेकडून पीक कर्ज मिळत नसल्याने त्रस्त होऊन विषारी औषध प्राशन करून बँकेतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदरील शेतकऱ्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या शेतकऱ्यावर उपचार सुरू आहेत.

भुजंग माणिकराव पोले (रा. जोडपिंपरी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सदरील शेतकरी पीक कर्जासाठी मागील अनेक महिन्यांपासून औंढा नागनाथ शहरातील बाजार मैदान येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चक्रा मारत होते. मात्र प्रत्येक वेळेस बँकेकडून टाळाटाळ केली जात होती.

बँकेकडून पीक कर्ज मिळत नसल्याने अखेर त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने 20 सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बँकेत बँक मॅनेजर समोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सावंत व कर्मचारी तात्काळ बँकेत हजर होऊन शेतकरी भुजंग पोले यांना वाहनाद्वारे ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झाली नसल्याचे समजते.

Related posts

सहा सोशल मीडिया वापरकर्त्यांवर सायबर सेलची कार्यवाही, मीडिया पेज अकाउंट केले बंद!

Santosh Awchar

कधीही या कार्यालय बंदच; हिंगोली तलाठी कार्यालयाचा भोंगळ कारभार

Santosh Awchar

अभियंत्याच्या जेसीबीने कामे केली तरच मिळताहेत विहिरीच्या कामाचे बिल! सेनगाव येथील प्रकार

Gajanan Jogdand

Leave a Comment