Marmik
Hingoli live

ग्रामसेवक संघटनेचे असहकार; प्रलंबित मागण्या सुटल्या नाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली :- ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित प्रश्न व मागणी अद्याप पर्यंत सुटल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई. तालुका शाखा हिंगोलीच्या वतीने 2 सप्टेंबर पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन हिंगोली पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

माहे जानेवारी 2021 ते जुलै 2022 पर्यंत ग्रामसेवक संवर्गाच्या पगारी नियमित व वेळेवर न झाल्याने जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, ग्रामसेवक संवर्गाच्या मासिक वेतनातून कपाती होऊन देखील कर्ज हप्ते व शेडूल वेळेवर न पाठविणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी.

भविष्य निर्वाह निधी व एनपीएस स्लिप्स वेळेवर वाचूक परिपूर्ण न दिल्याने संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, सहाव्या वेतन आयोगाचे विविध हप्ते जीपीएफ खात्यात व्याजासह आजपर्यंत जमाने केल्याने संबंधितावर कार्यवाही करावी, ग्रामसेवकाचे वैद्यकीय परिपुर्तता बिल अदान न केलेल्या संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी.

निलंबित ग्रामसेवक यांना तात्काळ सेवेत घेणे व निलंबन कालावधी नियमित करणे, कोरोना काळातील मयत झालेल्या ग्रामसेवक बांधवांचे विमा कवच त्रुटीतील प्रस्ताव पूर्ण करून अद्याप पर्यंत न पाठविलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी, ई टेंडर व इतर शासकीय कपाती बाबत प्रशिक्षण द्यावे, कंत्राटी ग्रामसेवकांची दहा हजार रुपयांची अनामत परत करावी, प्रलंबित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरित करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई. 136 तालुका शाखा हिंगोली अध्यक्ष यांची स्वाक्षरी आहे. निवेदन देताना ग्रामसेवक बांधव उपस्थित होते.

Related posts

आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या 12 सोशल मीडिया वापरकर्त्यावर कारवाई

Santosh Awchar

सरपंच पतीस पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

Santosh Awchar

चोरी, घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment