Marmik
क्राईम

आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या 10 व्हाट्सअप वापरकर्त्यांना नोटीस

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात, जाती – धर्मात तेढ निर्माण होईल तसेच महापुरुषांची विटंबना होईल व सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एकूण 10 सोशल मीडिया वापर करताना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अन्वये नोटीस देण्यात आली आहे. ही कार्यवाही हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल विभागाने केली.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा. तसेच सोशल मीडियाचा वापर करून त्यात बाधा येऊ नये, त्यावर प्रतिबंध व्हावा त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीवर आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सायबर सेल विभागास विशेष सूचना व मार्गदर्शन करून कार्यरत केले आहे.

सदर पथकात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिसांबलदार दीपक पाटील, दत्तात्रय नागरे, इरफान पठाण, मपोशि प्रणिता मोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सदरील सायबर सेल विभागाने 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान सोशल मीडियावर विविध समाज माध्यमांमध्ये, जाती – धर्मात तेढ निर्माण होईल तसेच महापुरुषांची विटंबना होईल व सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एकूण 10 व्हाट्सअप वापर करताना प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अन्वये नोटीस देण्यात आली आहे.

अशा प्रकारे जाती – धर्मात तेढ निर्माण करणारे तसेच अफवा पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इसमावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये व भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.

असे कृत्य करणाऱ्यांची जलवारी अटळ असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

Related posts

कापड दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच रचला खंडणीचा ‘प्लान’! मुख्य आरोपीस राजस्थान येथून अटक, व्यापाऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास

Santosh Awchar

पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा डाव उधळला! घातक हत्यारासह तीन जण ताब्यात!!

Santosh Awchar

ईसापुर रमना येथील महिलेचे खून प्रकरण; आरोपी पतिवर गुन्हा दाखल

Santosh Awchar

Leave a Comment