Marmik
Hingoli live क्राईम

जिजामाता नगर मधील गुन्हेगार एका वर्षासाठी स्थानबद्ध; डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची एमपीडीए अंतर्गत नववी कार्यवाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील जिजामाता नगर मध्ये राहणारा सराईत गुन्हेगार निखिल कल्याणराव डोरले यास हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. एमपीडीए अंतर्गत डॅशिंग पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केलेली आतापर्यंतची ही नववी कार्यवाही आहे. त्यांच्या या कारवाईने गुन्हे करणाऱ्या माफियात मोठी खळबळ उडाली आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर साहेब यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारताच जिल्हयातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणा-या विरूध्द कडक कार्यवाहीची भुमिका घेवुन अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपींची इत्यभुत माहीती काढुन ते करत असलेल्या गुन्हयांना प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी त्यांचे विरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता व एम. पी.डी.ए. कायदा अन्वये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली जात आहे.

त्यानुसारच मागील अनेक वर्षापासुन नामे निखील कल्याणराव डोरले (वय २५ वर्ष रा. जिजामाता नगर, हिंगोली) हा मागील अनेक वर्षापासुन हिंगोली शहर पोलीस स्टेशन हददीत तसेच हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन हददीत शरीरा विरूध्दचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सतत करत आहे.

त्याचे विरोधात हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न करणे, हत्यार घेवुन दंगा करणे मारामारी करून गंभीर दुखापत करणे अशा गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत. तो अशा प्रकारचे सतत गंभीर गुन्हे करत असल्याने समाजासाठी धोकादायक बनला होता. त्याचे कृत्यामुळे परीसरातील नागरीकांमध्ये भिती व असुरक्षीततेची भावना निर्माण झाली होती.

तो गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे करीत असल्याने समाज स्वास्थास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचविणारा धोकादायक इसम ठरला होता.

म्हणुन पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे मार्फतीने नमुद इसमा विरूध्द महाराष्ट्र झोपडपटटी, हातभटटीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कालवकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती ( व्हिडीओ पायरेट्स वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणा-या व्यक्ती हयांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्या बाबतचा अधिनियम १९८१ (एम.पी.डी.ए) अंतर्गत कार्यवाही बाबत प्रस्ताव डॅशिंग पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांचेकडे सादर केला होता.

पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी करून सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी हिंगोली यांचेकडे पाठविला. जिल्हाधिकारी हिंगोली जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची संपुर्ण सविस्तर पडताळणी करून नमुद ईसम नामे- निखील कल्याणराव डोरले (वय २५ वर्ष रा. जिजामाता नगर, हिंगोली) हा एक सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरून धोकादायक व्यक्ती बनल्यामुळे त्यास एम.पी. डी. ए. कायदा १९८१ ( सुधारणा १९९६, २००९ आणि २०१५ ) कलम ३(१) अन्वये ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले आहेत.

स्थानबध्द इसम निखील कल्याणराव डोरले य ताब्यात घेतले असुन परभणी जिल्हा कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related posts

प्रवासी व वाहतूक करणाऱ्या चालकांना मार्गदर्शन; रस्ता सुरक्षा अभियानाचा चौथा दिवस

Santosh Awchar

हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; आमदार तानाजी मुटकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Gajanan Jogdand

सहा घनमीटर साग जप्त, कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांची धडाकेबाज कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment