Marmik
सिनेमा

आयुष्याकडे नव्याने पाहायला शिकवणारा ‘ओले आले’ मराठी चित्रपट 

चंदेरी – सोनेरी :- गणेश पिटेकर

काही चित्रपट आयुष्याकडे नव्याने पाहायला शिकवतात. असं वाटतं की अरे आयुष्याचा अर्थ आपल्याला अर्धाच माहीत आहे. त्यातील काही संवाद कुठे तरी लिहून ठेवावा आणि तो नेहमी वाचत बसावं. काही वेळेस चित्रपट आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री असल्याने पाहायला बरेचं जण जातात

 ‘ओले आले’ हा मराठी चित्रपट पाहिला. त्यात  नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव यांची प्रमुख भूमिका आहे. आदित्य (सिद्धार्थ) याची स्वतः ची कंपनी आहे. त्याला वडील ओमकार (नाना) यांना द्यायला वेळच नाही. वडील कोणते ना कोणते कारण देत मुलाने स्वतः साठी आणि त्यांच्यासाठी वेळ काढावा यासाठी  ना – ना युक्त्या लढवत वडील आदित्याला तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्याला जगातील प्रत्येक देशात स्वतः च्या कंपनीचे कार्यालय असावेत अशी इच्छा असते.    

सकाळी व्यायाम करत असताना आदित्य ट्रेडमिलवरून पडतो. त्याला दवाखान्यात दाखल केले जाते. आणि चित्रपटातील दुसरा भाग सुरु होतो. रिपोर्ट मध्ये कळते की आदित्य याच्या बाबाला ब्रेन ट्युमर झालं आहे. आता आयुष्य हाती फार राहिलेले नाही. मग मुलगा आपल्या वडिलाच्या एकेक इच्छा पूर्ण करतो. उत्तराखंडमधील चोपता या गावी जायची इच्छा  तो व्यक्त करतात. तिथे पोहोचे पर्यंत आदित्याला आयुष्याचे महत्त्व कळते.

चित्रपटातील गाणी ही खूपच अर्थपूर्ण आहेत. बाबुराव ही मकरंद अनासपुरे यांनी केलेली घर गड्याची भूमिका चांगली झाली आहे. चोपत्याला जाताना वाटेत कायरा (सायली) भेटते. आणि शेवटी हे तिघे चोपत्याला पोहोचतात.       

आयुष्य किती जगला याला महत्त्व नाही. ते कसं जगला याला महत्त्व आहे. जगाशी ‘कनेक्ट’ असणारी पिढीच्यांशी ‘डिस्कनेक्ट’ असते. नोकरी पैसा हे म्हणजे सर्व काही नसतं. तुम्हाला जीवनातला प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. चित्रपट तुम्हाला  हसवत आणि भावनिक करतो. दिग्दर्शन  आणि पटकथा विपुल महेता यांनी केले आहे.

Related posts

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

Gajanan Jogdand

दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘रीलस्टार’चे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रीलस्टार’

Gajanan Jogdand

भूताला मुक्ति, तर तरुणाला प्रेम मिळवण्यासाठीचा रंजक प्रवास, ४ ऑक्टोबरला रंगणार “एक डाव भुताचा”

Gajanan Jogdand

Leave a Comment