मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – गुरू गौतम श्री श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघ, सिडको तर्फे शनिवार दि. ३१ ऑगस्ट ते ०८ संप्टेबर या दरम्यान श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालय प्रागणात पर्युषण महापर्व आराधने चे आयोजन करण्यात आले आहे.
भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त पर्युषण पर्वाच्या पाचव्या दिवशी श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालयामध्ये सकाळी ६.०० वाजता शहनाई वादन, सकाळी ६.३० वाजता श्री शंखेश्वर पार्श्वनाथ भगवान, आदेश्वर भगवान, कुंथुनाथ भगवान, शांतीनाथ भगवान, मुनि वत स्वामी भगवान, महावीर स्वमी भगवान, गौतम स्वामी, सरस्वती माता, पद्मावती माता, मणिभद्रवीर स्वामी आदि भगवतांचा अभिषेक आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ७.०० ते ८.०० वाजेपर्यंत संगीतमय स्नात्र पुजा केलि जाइल. सकाळी ८.०० वाजता भगवतांची आरती करण्यात येणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता प्रतिकमण होणार.
सायंकाळी ७.३० वाजता श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालय प्रांगणात भगवतांचा पाळना व् माता त्रिशाला आलेल्या चौदा स्वप्न भाविकांच्या दर्शानासाठी सुंदर अशी सजावट करूण ठेवण्यात येणार आहे. या प्रसंगी नवसारी येथील सुप्रसिध्द जैन संगीतकार आकाश शहा यांच्या भक्तीगीतांच्या कायक्रमात वीर झूले त्रिशाला झुलावे या विषयावर नवीन भक्तीगीत प्रस्तुत करनार आहे.
भक्तीसंध्या मध्ये (३ ते १० वर्ष) बालक बालीकांसाठी स्व. कचरुलालजी मुथा, स्व. सुरजदेवी मुथा यांच्या स्मरणार्थ अनिल मुथा, डॉ. संदिप मुथा (जालनावाले) मुथा मोटर्स तर्फे भेटवस्तु देण्यात आली. भक्तीसंध्येत लकी ड्रा चे आयोजन करण्यात आले होते. विद्या प्रफुल बाफना व आ.अतुल सावे या गुरूभक्त परिवारा तर्फे विजेत्यांना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
या प्रसंगी मनिषा संजय भंसाली परिवारा तर्फे सजावट व्यवस्था व रतिलाल प्रविनकुमार मुगदिया (नम्रता ग्रुप) परिवारा तर्फे प्रभावणा देण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री १०.०० वाजता श्रीशंखेश्वर पार्श्वनाथ भगवान, भगवतांचा आरती व मंगलदिवा तसेच मणिभद्रवीरची आरती, पद्मावती माताजींची आरती चे चढावे होणार आहे. दि. ०६ संप्टेबर शुक्रवार रोजी कुमारपाल महाराजा हस्ते महाआरती संपन्न होणार आहे.
पर्युषण महार्वाच्या अंर्तगत प्रतिकमणची व्यवस्था सायंकाळी ६.३० वाजता अहिंसा भवन, सिडको एन ३ मध्ये करण्यात आली आहे. पर्युषण महापर्व आराधने अंर्तगत आयोजीत सर्व कार्यक्रमास सकल जैन बांधवानी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे असे आव्हान गुरू गौतम श्री श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघ तर्फे करण्यात आले आहे.