Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

नवरात्री महोत्सवनिमित्त समोशरण विधानास ध्वजारोहणाने प्रारंभ

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहाराच्या इतिहासामध्ये प्रथमच युगप्रवर्तक आदिनाथ दिगंबर जैन मंदिर अरिहंनगर येथे राष्ट्रसंत समाधीसम्राट आचार्य विरागसागर महाराज यांच्या मुल संघाचे शिष्य मुनिश्री १०८ विहीतसागर महाराज ससंघ यांच्या सानिध्यात नवरात्री महोत्सव निमीत्त्त दि.३ ते १२ ऑक्टोंबर पर्यंत समोशरण विधानाचे आयोजन करण्यात आले असुन आज सर्व प्रथम सकाळी ११.३० वाजता दुपारी अरिहंतनगर जैन मंदिरा पासुन मित्र नगर येथे विराग सिंधु सभागृहात भव्य कळसाची शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळी महिला डोक्यावर कळस घेवुन शोभायात्रेत पुढे चालत होत्या. तदनंतर १२.३० वाजता ध्वजारोहन करण्यात आले. तसेच १२.३० वाजता मंडप शुदी करण्यात आली. सकलीकरण व इंद्र प्रतिष्ठा १२.४५ वाजता करण्यात आली. भगवंताचा अभिषेक करण्यात आला.

तदनंतर समोशरण महामंडळ विधान पुजन प्रारंभ करण्यात आले. सर्व प्रथम यावेळी समोशरण विधानाचे ध्वजारोहन विजयकुमार रमेशचंद चंद्रकुमार महावीरकुमार पाटणी परिवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी मंगलाचरण करण्यात आले.

विधानामध्ये सौधर्म इंद्र इंद्राणी होण्याचा मान सुरेखा राजकुमार सेठी परिवार यांना मिळाला तसेच चक्रवर्ती इंद्र इंद्राणी होण्याचा मान पुष्पादेवी विजय कासलीवाल, कुबेर इंद्र म्हणुन अर्पित राहुल दिलीप शहा परिवार, महायज्ञनायक राजकुमार विशाल शाह, यज्ञनायक उषादेवी बबनलाल चुडीवाल, इशान्य इंद्र प्रेरणा मनोज कासलीवाल, सानत इंद्र भावना भरत शाह, महेंद्र इंद्र सुशिलादेवी मोतीलाल रावका, ब्रम्हइंद्र छाया प्रकाशचंद गंगवाल, ब्रम्होत्त्तर इंद्र्र जयश्री सचिन लोहाडे,

लांतव इंद्र अशोक उत्त्तमचंद पाटणी, शुक्र इंद्र सारिका प्रकाशचंद पांडे, महाशुव्रâ इंद्र ज्योती सतिश लोहाडे, सतार इंद्र राखी आनंदकुमार पांडे, सहत्रार इंद्र अनितादेवी सुरेंद्रकुमार गंगवाल, अनंत इंद्र मधु संदिप कासलीवाल, प्रणतइंद्र ज्योती संजय गंगवाल, आरण इंद्र जयश्री प्रमोद छाबडा, आच्युत इंद्र राणी विपीन कासलीवाल, कापिष्ठ इंद्र मिना राजकुमार अजमेरा आदी परिवारांना इंद्र इंद्राणी होण्याचा मान मिळाला.

यावेळी दुपारी ३ वाजता मुनिश्रींचे समोशरण महामंडळ विधानावर विशेष प्रवचन संपन्न झाले. तसेच संध्याकाळी आरती व शास्त्र वाचनाने कार्यकमाची सांगता करण्यात आली. यावेळी पंडीत अक्षय जैन यांच्या मार्गदर्शनामध्ये समोशरण विधान आयोजीत करण्यात येत आहे.

समाज बांधवांनी वरील कार्यकमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आचार्य विराग सागरजी महाराज चातुर्मास समिती व युग प्रवर्तक आदीनाथ दिगंबर जैन मंदिर अरिहंतनगर विश्वस्त एव महिला मंडल यांनी केले आहे.

Related posts

ट्रक, टँकर चालकांचा संप : ‘उद्योग नगरी’वर मोठं संकट! रस्त्यावर जाणवू शकतो शुकशुकाट

Gajanan Jogdand

प्रा.डॉ. रंजना दंदे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

Gajanan Jogdand

गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर शाळेत 78 वा भारतीय स्वातंत्र्य दिन

Gajanan Jogdand

Leave a Comment