Marmik
Hingoli live

पोषणमहा निमित्त डॉ. नामदेव कोरडे यांनी आरोग्याबाबत केले मार्गदर्शन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली– येथे सुरू असलेल्या पोषक महानिमित्त तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नामदेव कोरडे यांनी बालकांच्या व मातांच्या आरोग्य बाबत मार्गदर्शन केले.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अंगणवाडीच्या माध्यमातून दि. 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण अभियान राबविले जात आहे. त्या माध्यमातून नागरी प्रकल्प प्रमुख गणेश वाघ व मुख्य सेविका अंजली घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाच्या सहकार्याने कुपोषण आणि अनेमिया व आरोग्य बाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मस्तानशहा नगर भागात करण्यात आले होते. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, डॉ. अजहर देशमुख, शेख इमरान यांची उपस्थिती होती.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोरडे यांनी ॲनिमिया हा कशामुळे होतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्याबाबत हिरवे पालेभाज्या खाणे तसेच पोषक आहार मातांनी व बालकांनी खाण्याबाबत सांगितले.

याप्रसंगी बालके गरोदर माता किशोरवयीन मुली यांनी आहाराबाबत योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच पोषणासह सर्वांनी स्वच्छतेची काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन केले. आरोग्य विभागाच्या वतीने या भागात रक्त तपासणी व आरोग्य शिबिर लवकरच घेतले जाईल असेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन उषा वाठोरे यांनी केले तर आभार संगीता कोरडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शकुंतला दळवी, रेखा तातड, प्रतिभा कांबळे, शशिकला खडसे, संगीता गायकवाड, मीना मस्के, वैशाली सपकाळ, उषा देवकर यांच्यासह
राजमाता जिजाऊ गट क्र.1च्यासर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील गरोदर माता किशोरवयीन मुली व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

हिंगोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल 92 टक्के, वसमत तालुका अग्रेसर

Santosh Awchar

हिंगोली पोलिसांकडून नेत्र तपासणी व चष्मे वाटप; अनेकांनी घेतला लाभ

Santosh Awchar

29 जणांना पकडून न्यायालयात केले हजर, 49 जामीन पात्र वॉरंटचीही बजावणी

Santosh Awchar

Leave a Comment