मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – दुर्गम भागात असलेल्या दुर्ग सावंगी शिवारात तोडून ठेवलेले एक घनमीटर सागवान हिंगोली येथील कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी जप्त केले आहे.
हिंगोली तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात असलेल्या दुर्ग सावंगी शिवारात कोणीतरी सागवान तोडून ठेवले होते याची माहिती हिंगोली येथील कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांना मिळाली होती.
त्यावरून कर्तव्यदक्ष हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी त्यांच्या चम्मूसह सदरील ठिकाणी जाऊन छापा मारला असता या ठिकाणी तोडलेले अंदाजे एक घनमीटर सागवान मिळून आले.
सदरील सागवान त्यांनी जप्त करून विभागीय वन अधिकारी कार्यालय येथे आणले आहे. ही कार्यवाही हिंगोली विभागीय वनाधिकारी मनोहर गोखले, सहाय्यक वनसंरक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल चव्हाण, वनरक्षक जाधव यांनी केली प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.