मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – तालुक्यातील घोरदरी येथील एका 35 वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 16 जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आसाराम नीळकंठ हराळ (वय 35 वर्षे व्यवसाय शेती, रा. घोरदरी ता. सेनगाव जि. हिंगोली) असे मयताचे नाव आहे. आसाराम हराळ हा 15 जुलै रोजी दहा वाजेच्या सुमारास गावातून शेतात रस्त्याने जात असताना वाटेत एक नदी ओलांडत होता. त्यास पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुराच्या पाण्यात पडून बुडून मृत्यू पावला. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पो. ह. जाधव हे करत आहेत.
पाण्यात पडून मृत्यू झाल्याची ही सेनगाव तालुक्यातील यंदाच्या पावसाळ्यातील पहिलीच घटना घडली आहे. पावसात कुठेही जाऊ नये नदीच्या पुलावरून पाणी जात असल्यास फुल ओलांडू नये, असे आवाहन हिंगोली जिल्हा पोलिसांकडून केले जात आहे.