Marmik
Hingoli live News

रस्ता सुरक्षा अभियानात एकास रस्ता चिरडले; अभियानाला लागला रक्ताचा धब्बा

हिंगोली : गजानन जोगदंड

जिल्ह्यात एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान सुरू असतानाच हिंगोली शहरात एका ट्रकने पादचाऱ्यांसह झाल्याची घटना 25 जून रोजी घडली. त्यामुळे शहरात जी अभियान कशा पद्धतीने राबविली जाते याची प्रचिती येत आहे. अभियानादरम्यान घडलेल्या या घटनेने या अभियानाला शहरात रक्ताचा धब्बा लागला आहे

हिंगोली जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व नागरिक तसेच वाहनचालकांमध्ये वाहतुकीचे नियम व सुरक्षा बाबत जनजागृती व्हावी या व्यापक हेतूने जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 28 जून या दरम्यान जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह सुरू आहे. या अभियानात विविध जनजागृतीपर कार्यक्रम व वाहन चालक तसेच नागरिकात जनजागृती केली जात असली अपघाताच्या दोन घटना अभियानादरम्यान घडल्या. यातील पहिली घटना तरी 24 जून च्या रात्री हिंगोली सेनगाव महामार्गावर रिक्षाचालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाला यात एका महिला किरकोळ जखमी झाली. या अभियानादरम्यान दुसरी घटना हिंगोली शहरातील नांदेड नाका येथे एका ट्रकने पादचाऱ्यांसह चिरडले ची घटना 25 जून रोजी घडली. MH- 26 H-5624 हा ट्रक वाशिम येथून लिंबाळा एमायडिसी कडे जात असताना नांदेड नाका येथे एका वृद्ध पादचाऱ्यास चिरडले सदरील ट्रक हा भंगारचा असल्याचे तसेच ट्रक चालक का मद्य पिऊन ट्रक चालवीत असल्याचे समजते. यावरून हिंगोली येथे वाहनांची कशा पद्धतीने तपासणी होत आहे याची प्रचिती येते. घडलेल्या घटनेने एका व्यक्तीचा जीव गेला असून अभियानात तरी वाहनांची कसोशीने तपासणी करावी व अपघात होऊ नये, अशी रास्त मागणी हिंगोली शहरवासीयांतून होत आहे.

घटनेतील मयत व्यक्तीची ओळख पटली नसून व्यक्तीचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात देण्यात आला असल्याची माहिती समजते सदरील वाहन हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

Related posts

भांग पिऊन विभागीय वन अधिकारी कार्यालय करतेय काम!

Gajanan Jogdand

हिंगोलीच्या हळदीला मिळाले ‘जीआय’ मानांकन! ‘मार्मिक महाराष्ट्र’ च्या ‘दर्पण’ची दखल

Gajanan Jogdand

संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता : जिल्हा कृषि महोत्सव व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचा कार्यक्रम पुढे ढकलला

Gajanan Jogdand

Leave a Comment