Marmik
Hingoli live News

अभियंत्याच्या जेसीबीने कामे केली तरच मिळताहेत विहिरीच्या कामाचे बिल! सेनगाव येथील प्रकार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – सेनगाव पंचायत समिती अंतर्गत शासनाच्या विविध योजनांतील विहीर लाभार्थ्यांची कामे जेसीबी द्वारे न केल्याने सेनगाव पंचायत समिती अभियंता हे या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात कमी पैसे टाकून त्यांचे उर्वरित पैसे त्यांना दिले जात नाहीत, अशी तक्रार सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील विहीर लाभार्थ्यांनी केली आहे.

आडोळ येथील सुदर्शन विजयकुमार वाठोरे यांच्या आजी आसराबाई किसन पोघे रा. आडोळ यांना कृषी विभागाच्या ऑनलाईन सोडतीत विशेष घटक योजनेतून राष्ट्रीय कृषी विभागाच्या योजनेतून सिंचन विहीर या घटकासाठी निवड झाली. सेनगाव पंचायत समिती अभियंता सुभाष पाचपुते यांच्यावर गार्डनुसार त्यांनी काम सुरू केले. सदरील काम हे 30 फूट करणे अपेक्षित असताना जेसीबीद्वारे ते 24 फूट झाले.

सदरील जमिनीत खडक असल्याने कठीणता असल्याने समोरील काम होऊ शकले नाही. तेव्हा अभियंता पाचपुते यांनी 24 फुटाचे बिल रुपये एक लाख 33 हजार रुपयांचे बिल त्यांच्या बँक खात्यात टाकले.

सदरील बिल हे कोणत्या नियमानुसार टाकले हे समजत नाही. त्यानंतर अभियंता पाचपुते यांच्याकडील जेसीबीने जी कामे केल्या गेली त्या विहिरीचे बिल शासनाच्या कोणत्या नियमानुसार संपूर्ण टाकण्यात आले, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे.

अभियंता पाचपुते यांनी विहीर पॉईंट ची पाहणी केली तेव्हा त्यांनी एमबी साठी दोन हजार रुपये मागितले. ते अर्जदारांनी दिले. या पैशाची देखील पावती अपेक्षित असून कशाचे दोन हजार रुपये घेतले याबाबत लेखी देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनाही दिलेले निवेदन

सेनगाव पंचायत समिती अभियंता सुभाष पाचपुते यांनी आढळ येथील कौसाबाई विठ्ठल मार्कड यांचे अभियंता सुभाष पाचपुते यांच्या जेसीबी मशीन द्वारे केल्याने त्यांना 30 फुटाचे किती बिल टाकण्यात आले व त्यांच्याकडील सातबारा वरील विहिरीची पडताळणी करावी. तसेच आशाबाई पोघे यांनी 24 फूट काम केले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन झालेल्या कामाची पाहणी करावी व अभियंता पाचपुते यांनी बिलात भेदभाव का केला याची चौकशी करावी.

आडोळ येथील एससी, एसटीच्या विहिरी केवळ अभियंता पाचपुते यांच्या जेसीबीने न केल्याने शासनाचे अधिकारी बिल कमी टाकत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या विहिरींच्या खोदकाम व बांधकामाचे बिल कोणत्या नियमानुसार टाकण्यात आले याची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी अभियंता पाचपुते यांना जाब विचारून त्यांच्यावर चौकशी करावी, अशी मागणीही सुदर्शन वाठोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related posts

आज जागतिक शौचालय दिन: जिल्ह्यातील गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, जि. प. सीईओंचे आवाहन

Gajanan Jogdand

हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी उद्यापासून प्रक्रियेला सुरवात – जिल्हाधिकारी पापळकर

Santosh Awchar

हिंगोली येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सव: ग्रंथ प्रदर्शन-विक्री, नवोदितांचे कवी संमेलन, परिसंवाद, व्याख्यानाची मेजवानी

Santosh Awchar

Leave a Comment