मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात हिंगोली जिल्ह्यातील प्रलंबित हरवलेले इसम व बालके यांच्याबाबत 21 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान विशेष शोध मोहीम ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले.
सदर मोहीम स्थानिक गुन्हे शाखा व हिंगोली जिल्ह्यातील सर्व 13 ही पोलीस स्टेशन स्तरावर राबविण्यात आली. सर्वच पोलीस ठाणे स्तरावर सदर मोहिमेसाठी विशेष अंमलदारांचे पथक निर्माण केले गेले होते.
या मुस्कान मोहिमेचा उद्देश व कार्यवाही याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सर्व पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.
सदर मोहिमेत हिंगोली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करताना एकूण मिसिंग मधील 29 पुरुष 20 महिला असे 49 जणांचा शोध घेऊन सदर मिसिंग प्रकरणे निकाली काढले.
या मोहिमेदरम्यान कलम 363 भादवी गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन सदरचा गुन्हा निकाली काढला गेला.